कोकण

काँग्रेसच्या संघटनबांधणीला वेग

CD

57807

काँग्रेसच्या संघटनबांधणीला वेग

तालुकानिहाय बैठका; नव्या पदाधिकाऱ्यांसाठी अर्ज मागविणार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची संघटनबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी येत्या २१ ऑगस्टपासून ३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर येथील एमआयडीसी विश्रामगृहात जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी व तालुकाध्यक्षांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत संघटन विस्तार, मतदार यादी तसेच विविध आघाड्या व विभागांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत जिल्ह्यातील मतदार याद्या आणि संबंधित कामकाजाचा आढावा घेण्यात आला. मतदार यादी पडताळणी किंवा नोंदणीसंदर्भात अधिकृत माहिती आणि अपडेटसाठी नागरिक मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र किंवा भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. तालुका कार्यकारिणीचा विस्तार आणि शहर अध्यक्षांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील विविध सेल आणि विभागांचे अध्यक्ष, समित्या आणि नव्या नियुक्त्यांसाठी इच्छुुकांकडून अर्ज मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सचिव यांची तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
येत्या पंधरवड्यात होणाऱ्या तालुकास्तरीय बैठका अशा ः वेंगुर्ला - २१ ऑगस्ट सकाळी १०. ३० समन्वयक विजय प्रभू, डॉ. विवेक रायकर, देवानंद लुडबे, कुडाळ - २४ ऑगस्ट सकाळी १०.३० समन्वयक विजय प्रभू, केतनकुमार गावडे, देवगड - २५ ऑगस्ट सकाळी १०.३० समन्वयक प्रवीण वरुणकर, ॲड. राजन यादव, कणकवली २९ ऑगस्ट सकाळी १०. ३० समन्वयक अनिल डेंगवेकर, ॲड. राजन यादव, वैभववाडी - ३० ऑगस्ट दुपारी ३ समन्वयक अनिल डेंगवेकर, प्रवीण वरुणकर, सावंतवाडी - १ सप्टेंबर सकाळी १०. ३० समन्वयक नागेश मौर्ये, सुभाष दळवी, दोडामार्ग - २ सप्टेंबर सकाळी ११ समन्वयक वासुदेव नाईक, देवानंद लुडबे, मालवण - ३ सप्टेंबर सकाळी १०.३० समन्वयक मेघनाद धुरी, राजेंद्र मसुरकर.
दरम्यान, या बैठकीला जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे, प्रकाश जैतापकर, उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, विद्याप्रसाद बांदेकर, नागेश मौर्ये, विजय प्रभू, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, देवानंद लुडबे, प्रवीण वरुणकर, केतनकुमार गावडे, जिल्हा सचिव ॲड. राजन यादव, चंद्रसेन सावंत, मधुकर लुडबे, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, गुणाजी गवस, भालचंद्र जाधव, बाबाजी पांचाळ, सुधीर चांदेलकर, नंदकिशोर प्रसादी, अमृत राऊळ, पराग माणगावकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅफे फ्लाईंग जिप्सी प्रकरण! साताऱ्यात वाद, पुण्यात जीवघेणा हल्ला, प्रसिद्ध रिलस्टारसह सात जणांना अटक

सचिन आणि माझ्यात आधी मैत्री नव्हती... अशोक सराफ यांचा चकीत करणारा खुलासा; म्हणाले- मी त्याच्या वडिलांना...

इन्स्टाग्रामवर ओळखीनंतर भेटायला बोलावलं, बंद खोलीत नेत अल्पवयीन मुलांचं १४ वर्षीय मुलीसोबत घाणेरडं कृत्य; नालासोपाऱ्यात काय घडलं?

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय मागे घेण्याची मागणी

अमित मालवीय यांना हटवलं, भाजपच्या IT सेलची कमान आता केमिस्ट्री प्राध्यापकाच्या हाती, कोण आहेत दीपक म्हस्के?

SCROLL FOR NEXT