कोकण

भांबेड येथे आमदार सामंत यांचा वारकऱ्यांशी संवाद

CD

- rat१७p२४.jpg-
P26O57822
लांजा ः सोनूबाबा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संस्था, भांबेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संस्थेच्या सातव्या सर्वसाधारण सभेला आमदार किरण सामंत यांनी उपस्थित राहून वारकरी संप्रदायाशी संवाद साधला.
---
वारकऱ्यांच्या अडचणी सोडविणार
किरण सामंत ः भांबेड येथे वारकऱ्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १८ : ‘वारकरी परंपरा हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पायी दिंडीने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधांसाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,’ असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.
सोनूबाबा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संस्था (भांबेड) यांच्या वतीने आयोजित संस्थेच्या ७ व्या सर्वसाधारण सभेत आमदार सामंत यांनी वारकरी संप्रदायाशी संवाद साधला. या वेळी वारकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. भांबेड परिसरातील वारकरी संप्रदायासाठी पायी दिंडीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सेवा कार्य सुरू आहे. धार्मिक यात्रांदरम्यान वारकऱ्यांना प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः भांबेडला शाहूवाडीशी जोडणाऱ्या ‘गावडी घाट’ रस्त्याची मागणी वारकरी व ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने आमदारांचे आभार व्यक्त करण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: श्रीलंकेने डाव टाकला! १४ शतकं झळकावणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री; रेफरीने दिली परवानगी, नेमकी गडबड काय?

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

तेव्हा आम्ही खूप तरूण होतो... 'मर्डर' मधल्या बोल्ड सीन्सबद्दल बोलली मल्लिका शेरावत; म्हणते, 'इमरानने मला खूप...

Shivsena SC Hearing LIVE Updates : आधी आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाल, मग पक्ष कुणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवाद

SCROLL FOR NEXT