- rat१७p१४.jpg -
26O57780
मंडणगड : कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. विनय नातू. सोबत जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अजय दळवी, दत्ताजी महाडीक, वसंत ताम्हणकर, सचिन थोरे.
---
आंबडवेच्या विकासासाठी प्रस्ताव पाठवा
डॉ. विनय नातू ः नागरिकांशी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः केंद्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव ‘आंबडवे’चा पंचतीर्थात समावेश केला आहे. त्यामुळे आंबडवेसह मंडणगड तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची गावे, ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरांच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे आवाहन सिंधुरत्न समृद्धी योजना २.० चे उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.
रविवारी (ता. १६) मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी डॉ. नातू यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तालुक्यातील पर्यटन, कृषी, महिला बचत गट आणि सेवा उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी या योजनेचा प्रभावी वापर करण्याचे त्यांनी सुचवले. या प्रसंगी त्यांनी ग्रामीण पर्यटन, बॅकवॉटर पर्यटन, कांदळवन (मॅंग्रोव्ह) संवर्धन तसेच कॅराव्हॅन सुविधांच्या माध्यमातून पर्यटनाच्या उपलब्ध संधी स्पष्ट केल्या. मंडणगड तालुक्याला मोठा नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे गावनिहाय गरजा ओळखून संबंधित शासकीय विभागांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे संयोजक अजय दळवी, तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडीक, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन थोरे, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष रविकुमार मिश्रा, खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, जिल्हा सोशल मीडिया संयोजक वैभव नारकर, ॲड. सुशील दळवी, महिला मोर्चा अध्यक्षा श्रेया दळवी, शहराध्यक्ष आनंद नारकर, डॉ. प्रभाकर पेंडसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.