- rat१८p११.jpg-
P26O57964
राजापूर ः झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे आणि मान्यर.
मयूर, अथर्व, नीलम अन् प्राप्ती प्रथम
राजापुरातील मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ः राजापूर नगर पालिकेचा १५०वा वर्धापनदिना निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पाच किलोमीटरमध्ये पुरुष गटात मयूर सोयीने, एक किमी गटात अथर्व मांजलकर, तीन किमी महिला मोठा गटात निलम पाष्टे तर लहान गटात प्राप्ती तरळ यांनी अव्वल कामगिरी केली.
मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण नगराध्यक्ष अॅड. हुस्नबानू खलिफे, उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, सभापती विनय गुरव, महिला व बालकल्याण समिती सभापती शबाना मुल्ला, सभापती सुबोध पवार, सभापती सौरभ खडपे, विरोधी गटनेते अॅड. राहुल तांबे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार किरण सामंत, उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार विकास गंबरे यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेचा गटनिहाय निकाल असा ः (प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे) ः पाच कि.मी. पुरुष मोठा गट : मयूर सोयीने, ओमकार भेरे, आयुष मटकर. एक कि.मी. पुरुष लहान गट ः अथर्व मांजलकर, हर्ष चव्हाण, स्वयम चाचे. तीन कि.मी. महिला मोठा गट ः नीलम पाष्टे, साक्षी मांडवकर, श्रुतिका मांडवकर. महिला लहान गट ः प्राप्ती तरळ, वेदिका मांडवे, आरोही जाधव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.