कोकण

डॉ. काणे संस्कृत केंद्रातर्फे चार ग्रंथांचे प्रकाशन

CD

‘संस्कृत केंद्रा’तर्फे चार ग्रंथांचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे चार महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प, पुस्तक, ग्रंथांचे अनावरण झाले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रसंगी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते.
धर्मशास्त्रातील आंतरविद्याशाखीय संशोधन या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन विशेष आकर्षण ठरले. या ग्रंथाचे प्रमुख लेखक प्रो. मधुसूदन पेन्ना असून प्रा. अविनाश चव्हाण आणि सई ओक हे सहलेखक आहेत. याज्ञवल्क्यस्मृती, नारदस्मृती, पराशरस्मृती तसेच कौटिलीय अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन धर्मशास्त्रीय ग्रंथांच्या आधारे आधुनिक विधीशास्त्राशी सांगड घालत धर्मशास्त्राचे आंतरविद्याशाखीय स्वरूप या ग्रंथातून उलगडण्यात आले आहे.
विश्वविद्यालयाच्या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी उपकेंद्रातील प्रा. कश्मिरा दळी यांनी १९१६ मध्ये प्रकाशित झालेल्या सनातन धर्म : हिंदू धर्म आणि नीतिशास्त्राचे प्राथमिक पाठ्यपुस्तक या इंग्रजी ग्रंथाचा सनातन धर्म या नावाने मराठी अनुवाद केला आहे. सनातन धर्माची तत्त्वे, मूल्यव्यवस्था यांचे सविस्तर विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune traffic: पुण्यात पोलिस रस्त्यावर उभं राहून ई-चलन करणार नाहीत! प्रायोगिक तत्त्वावर निर्णय; उच्चस्तरीय बैठक संपन्न

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये महिला भिडल्या, धक्काबुक्की करत एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

बाबा गाडीतून उतरले आणि अख्खा रानडे रोड जॅम झाला... अजिंक्य देव यांनी सांगितला दिवाळीतला तो किस्सा

Shivsena SC Hearing LIVE Updates : सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी संपली, सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला? वाचा...

SCROLL FOR NEXT