कोकण

वाफोलीत दहा एकर जंगल सपाट

CD

58064

वाफोलीत दहा एकर जंगल सपाट

वनशक्तीचा दावा; मोठी वृक्षतोड, बांद्यात विनापरवाना  प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ : सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडॉर आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जंगलतोड व विनापरवाना बांधकामे सुरू असल्याचे नवनवे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. वाफोली येथे नदीलगतचे सुमारे १० एकर घनदाट मूळ जंगल पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून, बांदा परिसरात एका कंपनीकडून कोणतीही पर्यावरण मंजुरी  न घेता दीड लाख चौरस मीटर क्षेत्रावर  टाउनशिप उभारली जात असल्याचा आरोप ‘वनशक्ती’ या पर्यावरणवादी संघटनेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केला आहे. या विरोधात प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात वनशक्ती संघटनेचे संचालक स्टॅलिन डी. यांनी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि सावंतवाडीचे उपवनसंरक्षक  यांना पत्र पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे, वाफोलीच्या परिसरात नदीकाठी असलेले १० एकर जंगल सपाट केले असून, आताही तिथे झाडे तोडण्याचे काम सुरूच होते. या जंगलतोडीमुळे वाघ आणि इतर वन्यजीव अन्नाच्या शोधात थेट गावात शिरून गुरांवर हल्ले करत आहेत. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होऊन जीवितहानी होण्याचा मोठा धोका आहे. याशिवाय परिसरात एका कंपनीद्वारे दीड लाख चौरस मीटर जमिनीवर  टाउनशिप उभारली जात आहे.  या प्रकल्पाला कोणतीही पर्यावरण मंजुरी  नाही. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान तिथे तीव्र उतारांची तोडफोड, बेकायदेशीर उत्खनन, नवे रस्ते, आरसीसी सीमांकन आणि मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याचे आढळले आहे. बिल्डर्स आणि दलाल केवळ ‘जमीन सपाट’ करण्याच्या परवानग्या दाखवून संपूर्ण जंगले नष्ट करत आहेत. पर्यावरण मंजुरीचा कडक नियम टाळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांना लहान-लहान टप्प्यांमध्ये विभागून काम करण्याची नवी युक्ती  वापरली जात असल्याचा आरोप पत्रात केला आहे.
---
57996
‘गूगल अर्थ’च्या सहाय्याने उपग्रह प्रतिमा
वनशक्ती संस्थेने जंगलाचे झालेले  नुकसान सिद्ध करण्यासाठी वनशक्तीने ‘गूगल अर्थ’ च्या उपग्रह प्रतिमा  तक्रारीसोबत प्रशासनाला सादर केल्या आहेत. त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्या अशा: वन आणि महसूल विभागाने वाफोली व बांदा येथील जागांची प्रत्यक्ष पाहणी करून उपग्रह प्रतिमांच्या आधारे पंचनामा करावा. पर्यावरण मंजुरी नसलेल्या प्रकल्पांना तातडीने ‘स्टॉप वर्क’ नोटीस देऊन दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. बेकायदेशीर तोडलेल्या वनजमिनींचा व्यावसायिक वापरासाठी  बदल मंजूर करू नये. झाडे तोडलेल्या ठिकाणी विकासकांच्या खर्चाने पुन्हा मूळ जंगलांचे पुनरुज्जीवन  करावे.
----------
कोट
सिंधुदुर्ग प्रशासनाने तातडीने या ठिकाणांची पाहणी करावी. उपग्रह (गूगल अर्थ) प्रतिमांची तुलना करून बेकायदेशीर कामांवर कारवाई करावी आणि जंगल पूर्ववत करावे. अन्यथा या प्रकरणी उच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल करावी लागेल.
- स्टॅलिन डी, संचालक, वनशक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mannat Snake Viral Video: नागपंचमीला शाहरुख खानच्या 'मन्नत' मध्ये खऱ्याखुऱ्या सापांची एंट्री; सगळेच घाबरले; कोणत्या जातीचा होता साप?

Lamgavhan Burglary Case: लामगव्हाण घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; १.९८ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत, दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

Talegaon Dhamdhere PMRDA Road Work: तळेगाव ढमढेरेत रस्तारोकोनंतर पीएमआरडीएचा बाह्यवळण रस्ता कामाला पुन्हा गती; ग्रामस्थ समाधानी

Education News: बौद्धिक क्षमता वाढवा, नोकऱ्या तुमच्याकडे येतील; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Pune traffic: पुण्यात पोलिस रस्त्यावर उभं राहून ई-चलन करणार नाहीत! प्रायोगिक तत्त्वावर निर्णय; उच्चस्तरीय बैठक संपन्न

SCROLL FOR NEXT