swt१८१२.jpg
57977
सावंतवाडी : येथील जिमखाना हॉल येथे ८० सूर्यनमस्कार साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले.
फिटनेस योग फाउंडेशनतर्फे साधना शिबिर
सावंतवाडी : स्वातंत्र्य दिनानिमित्त फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने ८० सूर्यनमस्कार साधना शिबिर उत्साहात पार पडले. ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील जिमखाना हॉल येथे हे शिबिर आयोजित केले होते. उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेविका सीमा नाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी योगशिक्षक शेखर बांदेकर, नारायण सावंत, रवींद्र प्रभू देसाई, महेश परब, रुपाली पेडणेकर, मृणाल सावंत, उत्कर्षा पाटणकर आदी उपस्थित होते. . यावेळी देशभक्तीपर गीत आणि समूहगीत सादर करण्यात आले. शिबिरात हिरकणी, महालक्ष्मी, वटसावित्री, एकमुखी दत्त मंदिर आणि वाटवे हॉल या फिटनेस योग फाउंडेशनच्या ५ योगवर्गांतील योगशिक्षक व साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन राजन राणे यांनी, प्रास्ताविक रसिका सावंत यांनी तर आभार चैताली गवस यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.