-rat१८p२.jpg-
OP26O57959
रत्नागिरी ः भाट्ये-पावस मार्गावरील वाढते अपघातावर उपाययोजना करण्यासाठी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, महामुनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदींनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.
-----
भाटे-पावस मार्ग होणार सुरक्षित
पोलिसांकडून क्षेत्राची पाहणी;‘ऑपरेशन टेप फॉर सेफ’ सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘ऑपरेशन टेप फॉर सेफ’ ही मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेंतर्गत अपघातप्रवण क्षेत्र मानल्या जाणाऱ्या भाट्ये-पावस रस्त्याची पोलिसांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्यावरील त्रुटी दूर करून अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश अधीक्षक नितीन बगाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी शहराला पर्यटनाच्या आणि स्थानिक वाहतुकीच्यादृष्टीने जोडणाऱ्या भाटे-पावस मार्गावर गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले होते. तीव्र वळणे, अंधारे टप्पे आणि वेगावर नियंत्रण नसणे यांमुळे या रस्त्यावर धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच दोन एसटी गाड्यामध्ये समोरासमोर धडक होऊन सुमारे २२ जण जखमी झाले होते. भाट्येतील अवघड वळणावर वारंवार अवजड वाहनांचे अपघात होतात. हे टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सुरक्षाविषयक तांत्रिक आणि प्रत्यक्ष बाबींची सखोल तपासणी केली. वाहनचालकांनीही नियमांचे पालन करून पोलिसदलाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
----
सूचवलेल्या उपाययोजना
* धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह टेप्स, रेडियम कॅट-आइज आणि दिशादर्शक फलक लावा.
* अपघातप्रवण ठिकाणी आवश्यकतेनुसार शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक आणि रुंद पांढरे पट्टे मारा.
* रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे आणि झुडपे तत्काळ हटवा.
* ब्लिंकर लाईट्स आणि आवश्यक तेथे पथदिव्यांची सोय महामार्ग व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.