कोकण

सिंधुदुर्ग पर्यटनाचे प्रभावी ब्रँडिंग करणार

CD

58024

सिंधुदुर्ग पर्यटनाचे प्रभावी ब्रँडिंग करणार

पर्यटनमंत्र्यांची ग्वाही; मंत्रालयात आमदार राणे, केसरकरांच्या उपस्थितीत बैठक

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच तेथील विविध पर्यटन स्थळांचे प्रभावी ब्रँडिंग केले जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज मुंबई येथे दिली. आमदार नीलेश राणे यांनी आज मुंबई येथील ‘मेघदूत’ निवासस्थानी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंत्री श्री देसाई म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे आणि ऐतिहासिक वारशाचे मोठे वरदान लाभले आहे. या भागातील पर्यटनाचा सर्वांगीण विकास करून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आमदार राणे यांनी मांडलेल्या कुडाळ-मालवणसह संपूर्ण जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर व नव्या प्रकल्पांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतले जातील. पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटनस्थळांचे प्रभावी ब्रँडिंग आणि सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल.’’
-----
जिल्ह्यात पर्यटनाची मोठी क्षमता
जिल्ह्याला लाभलेले विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, जलक्रीडा तसेच समृद्ध कोकणी संस्कृती आणि खाद्यपरंपरा यामुळे जिल्ह्यात पर्यटनाची मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा अधिक प्रभावीपणे वापर करून पर्यटनाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक सोयी अधिक सक्षम करणे, मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
----
प्रलंबित प्रकल्पांबाबतही चर्चा
संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटनविषयक प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील नव्या प्रकल्पांबाबत आमदार राणे यांनी पर्यटनमंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेनुसार नवीन सुविधा व उपक्रम राबवण्यासाठी राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचे प्रभावी ब्रँडिंग व प्रसिद्धी करणे, आधुनिक सुविधा निर्माण करणे आणि पर्यटकांसाठी सुरक्षित व दर्जेदार वातावरण तयार करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
----------------
कोट
पर्यटन विकासाचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला व्हायला हवा. त्यामुळे स्थानिकांना केंद्रस्थानी मानून पर्यटन विकासाचा विचार होणे आवश्यक आहे. पर्यटन वाढल्यास हॉटेल, होमस्टे, वाहतूक, हस्तकला आणि जलक्रीडा व्यवसायाला गती मिळेल. स्थानिक तरुण आणि उद्योजकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
- नीलेश राणे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपंचमीला शाहरुख खानच्या 'मन्नत' मध्ये खऱ्याखुऱ्या सापांची एंट्री; सगळेच घाबरले; कोणत्या जातीचा होता साप?

Lamgavhan Burglary Case: लामगव्हाण घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; १.९८ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत, दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

Talegaon Dhamdhere PMRDA Road Work: तळेगाव ढमढेरेत रस्तारोकोनंतर पीएमआरडीएचा बाह्यवळण रस्ता कामाला पुन्हा गती; ग्रामस्थ समाधानी

Education News: बौद्धिक क्षमता वाढवा, नोकऱ्या तुमच्याकडे येतील; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Pune traffic: पुण्यात पोलिस रस्त्यावर उभं राहून ई-चलन करणार नाहीत! प्रायोगिक तत्त्वावर निर्णय; उच्चस्तरीय बैठक संपन्न

SCROLL FOR NEXT