58034
करिअरसोबत देशसेवाही महत्त्वाची
नगराध्यक्षा भोंसले ः सावंतवाडीत गीत गायन स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शिक्षण घेत असताना इतरही कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसेच आपल्या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या नगराध्यक्ष श्रद्धा भोंसले यांनी केले.
नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बॅ. नाथ पै सभागृहामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवून शहरामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव नगराध्यक्षा भोंसले यांच्या हस्ते प्रिंटर प्रदान केला.
या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये सावंतवाडी शहरातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचे निकाल तीन गटांमध्ये जाहीर करण्यात आले. पहिली ते चौथी-सावंतवाडी एज्युकेशन प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा क्र. ६, जिल्हा परिषद शाळा क्र. ४, उत्तेजनार्थ मिलाग्रीस मराठी. पाचवी ते सातवी-मदर क्विन्स हायस्कूल, शाळा क्र. ४, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, उत्तेजनार्थ कळसुळकर हायस्कूल. आठवी ते दहावी-कळसुळकर हायस्कूल, मिलाग्रीस हायस्कूल, मदर क्विन्स हायस्कूल, राणी पार्वतीदेवी हायस्कूल.
प्रथम तीन व उत्तेजनार्थ क्रमांकांना गौरविले. दहावी व बारावी परीक्षेमध्ये शहरातून प्रथम, द्वितीय तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविले. हा गुणगौरव महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पर्यटन व उद्यान सभापती शर्वरी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबोरे, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक व ॲड. सायली दुभाषी यांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.