58052
कायमस्वरूपी मुख्याधिकारी
देण्यास सत्ताधारी अपयशी
मनसे ः मालवणचा प्रश्न सोडवा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : येथील नगरपरिषदेमध्ये सत्ता येऊन ८ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद भरण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी न मिळणे ही मोठी शोकांतिका असून, नागरिकांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सध्या ज्या अधिकाऱ्यांकडे मालवण नगरपरिषदेचा पदभार सोपवला आहे, ते अधिकारी आठवड्यातून अवघे २ दिवस उपलब्ध असतात. यामुळे नगरपालिकेशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रशासकीय व विकासात्मक कामे खोळंबली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सत्ताधारी शासन शासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे भरण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने सध्या पदभार सांभाळत असलेल्या अधिकाऱ्यांनाच कायमस्वरूपी पदभार सोपवावा. अथवा मालवण नगरपरिषदेसाठी तातडीने नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकारी पदाची भरती करावी अशी मागणी केली आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष गैरी अन्नरासिएशन, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.