कोकण

‘हार्मोनियम’ परीक्षेत मोरेश्वर सावंतांना यश

CD

57974

कुडाळ केळबाई मंदिरात
आज हरिनाम सप्ताह
कुडाळ ः कुडाळ-केळबाईवाडी येथील श्री देवी केळबाई मंदिरात उद्या (ता. १९) सात प्रहराचा हरिनाम सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता घटस्थापना, सायंकाळी ४ वाजता पारंपरिक वारकरी भजने सादर होणार आहेत. यात यशवंत बुवा श्री विठ्ठल रखुमाई हरिनाम (गिरगांव), वेताळ बांबर्डे वारकरी संप्रदाय (वेताळ बांबर्डे), कोचरा भजन मंडळ (कोचरा-मायनेवाडी), सद्‌गुरू वारकरी दिंडी भजन मंडळ, कुडाळ (बुवा विशाल राणे), श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक वारकरी भजन मंडळ (म्हापण पंचक्रोशी), माऊली प्रासादिक भजन मंडळ (किनळोस), ब्राह्मण सेवा भजन मंडळ, खवणे (पागेरेवाडी) यांची काकड आरती होणार आहे. सायंकाळी ६ पासून आकर्षक दिंड्यांचा कार्यक्रम होणार आहे. यात आई केळबाई बाल मित्रमंडळ (केळबाईवाडी कुडाळ), श्री केळबाई युवक मित्रमंडळ (कुडाळ) व नाबरवाडी मित्रमंडळ (कुडाळ) यांच्या दिंडी सहभागी होणार आहेत. गुरुवारी (ता. २०) सकाळी ९ वाजता गोपाळकाला होणार आहे.
----
58037
मोरेश्वर सावंत

‘हार्मोनियम’ परीक्षेत
मोरेश्वर सावंतांना यश
सावंतवाडी ः येथील मोरेश्वर सावंत यांनी हार्मोनियम संगीत परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय यश प्राप्त केले. आराध्या संगीत विद्यालय, सावंतवाडी येथे हार्मोनियम संगीताचे शिक्षण घेणाऱ्या सावंत यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने नोव्हेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या हार्मोनियम संगीत परीक्षेत हे यश मिळविले. त्यांना आराध्या संगीत विद्यालयाचे कपिल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि संगीतप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले.
---
57753
वैष्णवी पणदूरकर

वैष्णवी पणदूरकरचे
‘शिष्यवृत्ती’त यश
सावंतवाडी ः राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये ठाणे विभागातून ठाणे येथील भगवती विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी पणदूरकर हिने यश प्राप्त केले. ​वैष्णवी ही येथील वकील ॲड. सुभाष पणदूरकर यांची नात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT