कोकण

विद्यार्थ्यांनो, विज्ञानाची कास धरून प्रगती साधा

CD

58050

विद्यार्थ्यांनो, विज्ञानाची कास धरून प्रगती साधा

प्रमोद जठार : विजयदुर्ग किल्ल्यावर ‘जागतिक हेलियम डे’

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः हेलियमचे पाळणाघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्यातील किल्ले विजयदुर्गवर आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जागतिक हेलियम डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. आजचा दिवस म्हणजे विज्ञानातील एका शोधाचा वाढदिवस असल्याचे सांगुन तरूणांनी अंधश्रद्धेच्या मागे न लागता विज्ञानाची कास धरून आयुष्यात प्रगती साधण्याचे आवाहन विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात तंत्रज्ञान, विज्ञान याच्या शोधाचे जनक व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
१८ ऑगष्ट १८६८ ला सुर्यग्रहणावेळी नॉर्मन लॅकियर या शास्त्रज्ञाने किल्ले विजयदुर्गवर ज्या ठिकाणी आपल्या दुर्बिण लावून हेलियम वायुचा शोध लावला होता. त्या ‘साहेबांचे ओटे’ या ठिकाणी प्रतिकात्मक दुर्बिण ठेवून मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अवकाशात हेलियमचे फुगे सोडून आनंद व्यक्त केला. पावसाळ्यातील हिरवळीने नटलेल्या किल्ले विजयदुर्गला घोषणा आणि किलबिटाने जाग आली होती. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी आमदार जठार यांच्यासह नीरजा जठार, मानसी वाळवे, भाजपचे राजू राऊळ, गुरूनाथ राणे, पवन परुळेकर, राजेंद्र परूळेकर, डॉ. सुनील आठवले, प्रभारी सरपंच रियाज काझी, प्रसाद देवधर, लता गिरकर, सभापती गणेश राणे, पंचायत समिती सदस्या संजना आळवे, रवींद्र तिर्लोटकर, प्रदीप साखरकर, शुभा कदम, महेश बिडये, रवींद्र शेटये, रोहित महाडिक, संदीप बांदिवडेकर, चंद्रहास सावंत, राजू जठार आदी उपस्थित होते. सुरूवातीला विजयदुर्ग बसस्थानकापासून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीत ढोल पथकासह विविध मान्यवर, महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. मिरवणूकीतील छत्र्यांनी वातावरण हेलियममय झाले होते.
---
विजयदुर्गवरून ‘हेलियम’ वायुचा शोध!
श्री. जठार म्हणाले, ‘‘किल्ले विजयदुर्गवरून शास्त्रज्ञांनी ‘हेलियम’ वायुचा शोध लावल्यामुळे या ठिकाणाला फार मोठे महत्व आहे. विद्यार्थ्यांना का? असा प्रश्‍न पडल्याशिवाय अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळणार नाहीत. तरूणांनी विज्ञानाची कास धरून प्रगती साधावी. विजयदुर्गमधील सुरू असलेल्या पर्यटनात्मक प्रकल्पासाठी वाढीव निधी देऊ.’’
---
विजयदुर्ग बंदर ते माडबन ‘रोरो’ हवी!
‘हेलियम’ वायुच्या शोधाबाबतची माहिती देऊन डॉ. आठवले म्हणाले, स्थानिक पर्यटन वाढीसाठी विजयदुर्ग गावातील एका परिसराला ‘हेलियम’ असे नाव दिले जावे, किल्ले परिसरात कचरा तसेच प्लास्टिक टाकले जावू नये. विजयदुर्ग बंदर ते माडबन अशी सागरी रो-रो सेवा सुरू केल्यास पर्यटनाला गती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपंचमीला शाहरुख खानच्या 'मन्नत' मध्ये खऱ्याखुऱ्या सापांची एंट्री; सगळेच घाबरले; कोणत्या जातीचा होता साप?

Lamgavhan Burglary Case: लामगव्हाण घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; १.९८ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत, दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

Talegaon Dhamdhere PMRDA Road Work: तळेगाव ढमढेरेत रस्तारोकोनंतर पीएमआरडीएचा बाह्यवळण रस्ता कामाला पुन्हा गती; ग्रामस्थ समाधानी

Education News: बौद्धिक क्षमता वाढवा, नोकऱ्या तुमच्याकडे येतील; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Pune traffic: पुण्यात पोलिस रस्त्यावर उभं राहून ई-चलन करणार नाहीत! प्रायोगिक तत्त्वावर निर्णय; उच्चस्तरीय बैठक संपन्न

SCROLL FOR NEXT