कोकण

रक्षाबंधन सणासाठी डाक विभाग सज्ज

CD

रक्षाबंधन सणासाठी
डाक विभाग सज्ज
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ : रक्षाबंधनाच्या सणानिमित्त भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागाने विशेष तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये जलरोधक राखी लिफाफे तसेच स्पीड पोस्टची जलद व सुरक्षित सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत डाक सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डाक विभागामार्फत विशेष ग्राहक संपर्क, विक्री आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. राखी पाठविण्यासाठी विशेष जलरोधक राखी लिफाफे, स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच बुक केलेल्या स्पीड पोस्टची ट्रॅकिंग सुविधा आणि घरपोच संकलनाची सोयही उपलब्ध असून, पोस्टमनमार्फत ग्राहकांच्या दारी जाऊन पार्सल संकलित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. डाक सेवा-जनसेवा या भावनेतून सिंधुदुर्ग डाक विभाग प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा हा धागा जलद, सुरक्षित आणि विश्वासार्हपणे पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांनी राखी पाठविण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपल्या भावंडांपर्यंत प्रेमाचा संदेश वेळेत पोहोचविण्यासाठी आजच जवळच्या डाक कार्यालयात राखी बुक करा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT