- rat१९p१२.jpg -
26O58196
पेढांबे : येथील रस्त्यावर पटलेला खड्डा महामार्ग विभागांनी बुजवला होता; मात्र आठ दिवसात पुन्हा तो तयार झाला आहे
---
चिपळूण-पोफळी मार्गाची पुन्हा दुरवस्था
तात्पुरती डागडुजी उखडली; खड्डे सिमेंट-काँक्रिटने बुजवा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ : चिपळूण-पोफळी मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना होणारा त्रास कायम असतानाच संबंधित ठेकेदाराने केलेली तात्पुरती डागडुजी अवघ्या आठ दिवसांतच उखडल्याने रस्त्याची परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
चिपळूण-पोफळी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. विशेषतः पावसाच्या दिवसांत खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांना अधिक धोका निर्माण झाला होता.
खड्ड्यांची समस्या लक्षात आल्यानंतर ठेकेदाराकडून त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र ही डागडुजी अवघ्या आठ दिवसांतच उखडल्याने पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे केलेली दुरुस्ती कितपत टिकाऊ होती, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. पिंपळी येथील भरचौकात दोन मोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी मागील आठ दिवसात दुचाकींचे चार अपघात झाल्याची माहिती येथील स्थानिक ग्रामस्थ विजयी झुजम यांनी दिली. तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, खड्डे सिमेंट-काँक्रिटने बुजवावेत, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी खराब होण्यापूर्वी संबंधित विभागाने आणि ठेकेदाराने तातडीने पाहणी करून दर्जेदार पद्धतीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी आहे.
---
कोट
रस्त्यावरील खड्डे वारंवार बुजवण्याऐवजी त्यावर कायमस्वरूपी उपाय केला नाही तर प्रवाशांना आणि वाहनचालकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे चिपळूण-पोफळी मार्गावरील खड्ड्यांची सिमेंट-काँक्रिटने कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार? असा प्रश्न आहे.
- संपत पाटील, पेढांबे ता. चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.