कोकण

मनसेच्या मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र चव्हाण

CD

- rat१९p१६.jpg-
26O58201
जितेंद्र चव्हाण

मनसेच्या मध्य रत्नागिरी
जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र चव्हाण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १९ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांच्यावर मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या चव्हाण यांच्या या पुनर्नियुक्तीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मनसेच्या स्थापनेपासूनच राज ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर अनेक जनआंदोलने उभारली आहेत. यादववाडी पूल आणि कडवई रेल्वेस्थानक यांसारख्या प्रमुख नागरी समस्यांवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी ते प्रश्न तडीस नेले. त्यामुळे एक लढवय्या आणि धडपडी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज होऊन त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या काळात संघटनेत काहीशी मरगळ आली आणि त्यांचे काही सहकारी अन्य पक्षांत गेले; मात्र चव्हाण यांनी मनसेशी असलेली निष्ठा कायम ठेवत इतर कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC credit card: भाजप नेत्याला HDFC बँकेचा अनोखा दंड! 46 पैशांसाठी 1200 रुपयांचा विलंब शुल्क

ENG vs PAK 1st Test: अरे काय हे! ०.१ चेंडूवर पाकिस्तानची विकेट, कपिल देव यांनी ४३ वर्षांपूर्वी दिलेला असा धक्का, आता... Video Viral

इमरान हाश्मीकडून पत्नी प्रत्येक किसिंग सीनच्या बदल्यात घेते ‘हे’ गिफ्ट, काय करते परवीन शाहानी?

Marathi News Live Updates : दिल्लीतील इंदिरा भवन येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली

Baramati Robbery Crackdown: मंगळसूत्र चोरीचा तपास उलगडा; वडगाव पोलिसांच्या कारवाईत तब्बल दहा जबरी चोरीचे गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT