rat१९p१.jpg-
P26O58186
रत्नागिरी : गुरूवर्य एम. एन. जोशी इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी आणि मागे उभे मुख्याध्यापक, शिक्षक.
जोशी इंग्लिश स्कूलचे
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गुरूवर्य एम. एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.
रिधी वळवी (२४८ गुण) हिने जिल्हा गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक व रत्नागिरी तालुक्यात सातवा क्रमांक व हर्ष गायकवाड (२३६ गुण) याने जिल्ह्यात एकोणिसावा क्रमांक आणि रत्नागिरी तालुक्यात नववा क्रमांक मिळवला. स्वर सुवरे (२१८ गुण) याने जिल्ह्यात ४३वा क्रमांक व तालुक्यात २२वा क्रमांक, संदीप आंबेकर याने (२०० गुण) जिल्ह्यात ९१वा क्रमांक व तालुक्यात ४७वा क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अमोल गावडे, अनिकेत भोळे, सुरेखा पवार, स्नेहा कनगुटकर, स्नेहा वैद्य या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, व्यवस्थापक सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.