कोकण

विद्यार्थ्यांसाठी खगोल कार्यशाळा

CD

विद्यार्थ्यांसाठी खगोल कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : राष्ट्रीय अवकाश दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष खगोल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. खगोलप्रेमी, रत्नागिरी आणि आनंदालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रत्नागिरी नगरपालिकेच्या सहकार्याने ही कार्यशाळा रविवारी (ता. २३) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत माळनाका येथील श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे पार पडणार आहे.
यात सूर्यमालेची सफर घडवण्यात येईल. २D आणि ३D मॉडेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली सूर्यमाला प्रत्यक्ष संकल्पनांसह समजून घेता येईल. सूर्य आणि इतर विविध ग्रहांचे आकारमान तसेच त्यांच्यातील अंतराचा स्पष्ट व तुलनात्मक अभ्यास मांडला जाईल. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराचे विशेष २D मॉडेल प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध असेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) भविष्यात उपलब्ध होणाऱ्या विविध संधी आणि दिशा यावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll News: नवीन Highway वर आता 3 महिने टोल नाही? सरकारचा टेस्टिंग प्लॅन काय?

RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ठेवींवरील व्याजदराबाबत बँकांना भेदभाव करता येणार नाही; एक ऑक्टोबरपासून देशभरात नवे नियम लागू

Marathi News Live Updates : मुलांना दिलासा देण्यासाठी राहुल गांधी पुण्यात येत आहेत - सतेज पाटील

Pune News : दुबईहून दिल्लीला येत असलेला तरुण पुणे विमानतळावर बेपत्ता; विमाननगर पोलिसांकडे तक्रार

गोविंदा खरंच पत्नीसोबत घटस्फोट घेणार? सुनीता पोहोचली फॅमिली कोर्टात, VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT