swt191.jpg
58219
मळेवाड ः बाजारपेठ व्यापारी संघटनेच्या वतीने बांधकाम विभागाचे अजित पाटील यांच्याकडे निवेदन देताना रमाकांत नाईक, अशोक शिरसाट, नंदू नाईक, प्रकाश राऊत व इतर.
जकातनाका परिसरातील समस्या सोडवा
मळेवाड व्यापारी संघटना ः बांधकाम विभाग, महावितरणला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १९ ः मळेवाड जकातनाका बाजारपेठ परिसरातील विविध समस्यांकडे संबंधित विभागांचे लक्ष वेधण्यासाठी मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेच्या वतीने बांधकाम विभाग तसेच विद्युत पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले.
मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बाजारपेठ परिसरातील धोकादायक अवस्थेतील सर्कल तसेच जीर्ण झालेले विद्युत खांब या गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व व्यापारी व दुकानदारांच्या एकमताने या समस्यांबाबत संबंधित विभागांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमाकांत नाईक, उपाध्यक्ष अशोक शिरसाट, सचिव मदन मुरकर, नंदू नाईक व प्रकाश राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करून निवेदन देण्यात आले. दरम्यान, बांधकाम विभागाचे अजित पाटील( सावंतवाडी) तसेच विद्युत विभागाचे श्री. पेटकर (वेंगुर्ले) यांनी संबंधित समस्यांबाबत लवकर निर्णय घेऊन आवश्यक कामे करण्याचे आश्वासन दिले. बाजारपेठेतील नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्यांवर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यापारी संघटनेने व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.