कोकण

''एफडीए''मुळे रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित

CD

swt1916.jpg
58226
एडगाव ः ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित रानभाजी महोत्सवात सभापती सिध्देश रावराणे यांनी मार्गदर्शन केले.

‘एफडीए’च्या कारवाईमुळे रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित
सिध्देश रावराणे ः एडगाव ग्रामपंचायतीतर्फे प्रदर्शन, पाककला स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ ः ''एफडीए''कडून सध्या राज्यभर कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे आहारातील रानभाज्यांचे आहारातील महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून त्याचा अधिकाधिक वापर होण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती सिध्देश रावराणे यांनी येथे केले.
आत्मा समिती वैभववाडी, उमेद वैभववाडी आणि ग्रामपंचायत एडगावच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सभागृहात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव आणि रानभाजी प्रदर्शन, पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला साची कोलते, प्रगती तावरे, मंगेश कदम, प्रीमेश वाघ, उमाकांत पाटील, जयेंद्र रावराणे, सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिध्दी सुतार, मंगेश लोके, देवानंद पालांडे, साधना नकाशे, सरपंच रविना तांबे आदी उपस्थित होते.
श्री. रावराणे म्हणाले, ‘‘नवीन पिढी फास्ट फुडच्या आहारी गेली आहे. त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. गेले काही दिवस राज्यात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न प्रकिया उत्पादनासह विविध फुडवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व वाढणार आहे. रानभाज्यांचे मार्केटिंग देखील होण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहानजीकच्या जागेत रानभाज्या आणि गावठी भाज्या विक्रीकरिता ठेवता येतील का, या दृष्टीने प्रयत्न केले जातील." डॉ. विजय पैठणे यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व सांगितले.

चौकट
कृषी विभागाच्या कामावर तोंडसुख
तालुक्यात आत्मा समिती चांगले काम करीत आहे, परंतु कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही नियोजन सुरू नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभार असमाधानकारक असल्याचे मत जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या कारभारावर चांगलेच तोंडसुख घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुरत, गुवाहाटी अन् भाजपसोबत सत्तास्थापना... शिंदे गटाच्या बंडामागे काय होतं? कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला घटनाक्रम

Marathi News Live Updates : आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? - न्यायमूर्ती

जुन्नर हादरलं! शेजारच्या तरुणानं शेतात नेलं अन् १० वर्षांच्या मुलीसोबत घाणेरडं कृत्य..| Junnar case

IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

Nagpur Muddy Road: दीड वर्षातच पांदण रस्त्याची ‘माती’; देवमुंढरीचा रस्ता चिखलमय; दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT