कोकण

उक्षी रेल्वे स्थानकावर ''दिवा-सावंतवाडी'' थांबा द्या

CD

उक्षीत ‘दिवा-सावंतवाडी’ थांबा द्या
ग्रामस्थांची मागणी : संघर्ष कमिटीच्या कोअर कमिटीची स्थापना
सकाळ वृत्तेसवा
रत्नागिरी, ता. २० ः उक्षी रेल्वेस्थानकावर ‘दिवा-सावंतवाडी'' आणि ‘सावंतवाडी-दिवा’ या दोन्ही ट्रेनना पूर्ववत थांबा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता संघटित स्वरूप प्राप्त झाले आहे. या लढ्याला गती देण्यासाठी ‘उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष कमिटी’च्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, प्रशासनाकडे व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मागणीसाठी सध्या परिसरात सह्यांची मोहीमही जोरात सुरू आहे.
उक्षी रेल्वेस्थानक हे परिसरातील उक्षी, परचुरी, वांद्री, करबुडे, बावनदी, कोळंबे, आंबेड, फुणगूस, डिंगणी, रानपाट, जाकादेवी, चाफे यांसह सुमारे २५ ते ३० गावांतील नागरिकांसाठी प्रवासाचे प्रमुख केंद्र आहे. कोरोना महामारीपूर्वी या स्थानकावर दिवा-सावंतवाडी गाडी थांबत होती; मात्र, ताळेबंदीनंतर रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली तरी हा थांबा पूर्ववत करण्यात आला नाही. यामुळे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.
उक्षी स्थानकाचा थांबा पुन्हा सुरू करणे, हा संपूर्ण पंचक्रोशीच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे जनसमर्थन मिळवून रेल्वे प्रशासनावर दबाव आणण्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा नवनिर्वाचित समितीने दिला आहे.
--
अशी आहे संघर्ष समिती
रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी मुझम्मील काझी यांची निवड करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष हरिश्चंद्र बंडबे, प्रदीप चंदरकर, सचिव रमेश मेस्त्री, सहसचिव अब्दुल मुनाफ खतिब, खजिनदार अविनाश कळंबटे, संघटक वसंत मेस्त्री, चंद्रकांत वेद्रे, प्रवक्ते शरद जाधव, सुरेश कळंबटे, कायदेशीर सल्लागार ॲड. अरुण नागवेकर, सल्लागार अनंत कळंबटे, गोविंद कळंबटे तर कोअर कमिटी सदस्य सत्यवान वेद्रे, रवींद्र जाधव, उदय बेनकर, नंदकुमार कुवार, गजानन पानगले, पांडुरंग पाताडे, जगन्नाथ दुदम, संदीप सापटे, नितीन चंदरकर, प्रकाश शिगवण आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan News: शहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का! पाकिस्तानातील २५ मंत्रालये बनावट; तातडीने बरखास्त करण्याची शिफारस

ENG vs PAK: इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडूचे दोन तुकडे का केले? पाकिस्तानच्या पहिल्या डावानंतर नेमकं काय घडलं? Video viral

‘रात्री जेवणाचा प्रश्न असतो म्हणून तिचं कौतुक करतो’ अशोकमामा निवेदिता यांच्याबद्दल बोलताना म्हणाले; 'मला संसारातलं...'

Latest Marathi News Live Update: पालघर महावितरणचा कर्मचारी लाच घेताना अटक

शिक्षणापासून नोकरीपर्यंत... तृतीयपंथीयांच्या हक्कांचा आरसा दाखवणार ‘वंचिता’

SCROLL FOR NEXT