swt209.jpg
5845 1
शेर्ले ः शिवसेनेतर्फे केंद्रशाळेत खाऊ वाटप करण्यात आले.
शेर्ले केंद्रशाळेत शिवसेनेतर्फे खाऊ वाटप
सावंतवाडी ः शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रशाळा क्र.१ शेर्ले येथे विद्यार्थ्यांना खाऊ, वृक्षरोप व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. शाळेसाठी पंखा तसेच भिंतीवरील घड्याळे वाटप करण्यात आली. याप्रसंगी तालुकाप्रमुख बबन राणे, माजी सरपंच उदय धुरी, दयानंद धुरी, सरपंच प्रांजल जाधव, श्रावणी धुरी, प्रशांत जाधव, उत्कर्षा केरकर, शांताराम धुरी, अनिल पिंगुळकर, साहिल खोबरेकर, बाबा धुरी आदी उपस्थित होते.
.................
swt2010.jpg
58442
सांगली ः बाजीप्रभूंची भूमिका साकारलेले विनोद राणे.
विनोद राणे यांच्या अभिनयाचे कौतुक
म्हापण ः सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सादर झालेल्या ‘शिवराज भूषण’ या ऐतिहासिक नाटकात विनोद राणे यांनी शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची दमदार भूमिका साकारून रसिकांची वाहवा मिळवली. त्यांच्या प्रभावी अभिनयातून बाजीप्रभूंचे शौर्य, त्याग, स्वामिनिष्ठा आणि पराक्रम जिवंत झाल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली. परुळे गावचे सुपुत्र तसेच आंबेगाळीवाडीचे रहिवासी असलेल्या राणे यांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा अभ्यास करून भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयातील संवादफेक, देहबोली आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यामुळे नाटकातील बाजीप्रभूंच्या व्यक्तिरेखेला विशेष उठाव मिळाला. या नाट्यप्रयोगाला संभाजी भिडे यांची विशेष उपस्थिती होती. या उल्लेखनीय भूमिकेबद्दल राणे यांची राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याचे नमूद करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.