कोकण

दापोलीत ऑक्टोबरमध्ये कोकण बांबू परिषद

CD

दापोलीत ऑक्टोबरमध्ये
कोकण बांबू परिषद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता २० : बांबू शेती, प्रक्रिया उद्योग आणि बांबू आधारित व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘कोकण बांबू परिषद २०२६’चे आयोजन ८ व ९ ऑक्टोबर रोजी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात केले आहे. परिषदेत बांबू क्षेत्राशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रांसह क्षेत्रभेटीचे आयोजन केले आहे.
कोकणात बांबू लागवडीस मोठी संधी असून शेतकऱ्यांना बांबू लागवड, व्यवस्थापन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेबाबत मार्गदर्शन मिळावे, या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. बांबू क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असून शेतकरी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांना थेट संवादाची संधी मिळणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी परिषदेत सहभागी होण्याकरिता नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसून भोजन आणि राहण्याची व्यवस्थाही मोफत केली आहे. परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे आपली संपूर्ण माहिती भरून नोंदणी करावी. कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून केले आहे. नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/s१YkGKofBVxLY४rq९.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT