swt201.jpg
58441
वडाचापाट ः हायस्कूलमध्ये जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला.
वडाचापाट हायस्कूलमध्ये छायाचित्रण दिन
मालवण : भंडारी एज्यूकेशन सोसायटी संचलित श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट प्रशालेत जागतिक छायाचित्रण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन कला दालनात भरवले होते. या स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. छायाचित्रण ही केवळ एक कला नसून ते विज्ञानही आहे. फॅशन व मॉडेल फोटोग्राफी, वाइल्ड लाईफ व नेचर फोटोग्राफी, जर्नालिझम व डॉक्युमेंटरी, प्रॉडक्ट व ॲड फोटोग्राफी, फाईन आर्ट तसेच एरियल व ड्रोन फोटोग्राफी यांसारख्या विविध क्षेत्रांत करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत, असे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी स्पष्ट केले. प्रदर्शनातील विजेत्या छायाचित्रांचे परीक्षण शिक्षिका वेदिका दळवी व प्रतिभा केळुसकर यांनी केले. स्पर्धेत आर्या भांडे हिने प्रथम, निधी धारपवार द्वितीय तर सिया पाताडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ सिद्धी पालव, नेहा वरक आणि श्रवण सावंत यांना गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.