कोकण

''रावण-मंदोदरी विवाह''ची रसिकांवर मोहिनी

CD

swt२०६.jpg
58448
कुडाळ ः लाजरी ग्रुप कुडाळच्या मॉन्सून महोत्सवातील ‘रावण मंदोदरी विवाह’ संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगातील क्षण. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘रावण-मंदोदरी विवाह’ची रसिकांवर मोहिनी
कुडाळातील मॉन्सून महोत्सव ः ‘वीरभक्त तरणीसेन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित १४ व्या मॉन्सून महोत्सव २०२६ अंतर्गत सादर केलेला अजित गाडगीळ (मळेवाड) कथा संकल्पित ‘वीरभक्त तरणीसेन’ आणि ‘रावण-मंदोदरी विवाह’ या दोन्ही संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतारी कलाकारांच्या संचात सादर झालेले नाट्यप्रयोग पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह मुंबई व गोवा येथील नाट्यरसिकांनी मोठी गर्दी केली होती.
पौराणिक कथानक, आकर्षक नेपथ्य, प्रभावी अभिनय, दमदार संवादफेक, अनुभवी संगीतसाथ आणि कलाकारांच्या जिवंत सादरीकरणामुळे दोन्ही प्रयोग नाट्यरसिकांसाठी अविस्मरणीय ठरले. हा मॉन्सून महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी यादगार ठरला. येथील सिद्धिविनायक हॉलच्या सभागृहात लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीने आयोजित दोन दिवसीय मॉन्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता. १५) पहिल्या दिवशी ‘वीरभक्त तरणीसेन’ हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १६) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या कलाकारांच्या संचात ‘रावण-मंदोदरी विवाह’ हा नाट्यप्रयोग रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे उद्‍घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व उद्योजक धनंजय राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी लाजरी ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, सुनील धुरी, बाळा आकेरकर, संजय करलकर, गजानन गावस (गोवा), प्रसाद परब (मोरजी गोवा), स्वरुप सावंत, दीपक भोगटे, सिद्धेश वर्दम, प्रीतम कवठणकर, सदा अणावकर, बादल चौधरी, मामा घावनळकर, गोट्या कोरगावकर, अनुप शिरसाट, देवेंद्र पेडणेकर, सिद्धेश बांदेकर उपस्थित होते.
या नाट्यप्रयोगांसाठी लोकराजा (कै.) सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचे विशेष सहकार्य लाभले. कलाकारांच्या अभिनयाला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद देत प्रोत्साहन दिले. दोन दिवशीय या मॉन्सून महोत्सवाचा रविवारी रात्री समारोप झाला. ‘वीरभक्त तरणीसेन’ या नाट्यप्रयोगाला लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरुर) यांचे विशेष सहकार्य लाभले. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन सेन्सॉर बोर्ड सदस्य नाट्यकर्मी विजय चव्हाण, पप्पू पाटणकर यांच्या हस्ते झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Khambatki Ghat Tunnel Route : सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा! खंबाटकी घाटात 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली

Latest Marathi News Live Update : मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे व्यसन जडल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

SCROLL FOR NEXT