कोकण

मारुती ढेपसेंची स्वावलंबनाकडे वाटचाल

CD

- rat२०p१७.jpg-
26O58500
रत्नागिरी ः आरएचपी फाउंडेशनच्या सहकार्यातून दिव्यांग मारुती गणपत ढेपसे यांना निओमोशन व्हीलचेअर इलेक्ट्रिक गाडी मिळाली
---
मारुती ढेपसे यांची स्वावलंबनाकडे वाटचाल
इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा आधार; ‘आरएचपी’कडून सहकार्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः अपंगत्वामुळे आयुष्य थांबत नाही; योग्य आधार, आधुनिक साधने आणि जिद्द असेल तर स्वावलंबनाची नवी वाट निर्माण करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण नेवरे (ता. जि. रत्नागिरी) येथील मारुती गणपत ढेपसे यांनी दाखवून दिले आहे. शारीरिक व्याधी आणि बेडसोरसारख्या गंभीर अडचणींवर मात करत त्यांनी व्यवसायाशी असलेले नाते टिकवून ठेवले आहे. त्यांना नुकतीच ‘आरएचपी फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘निओमोशन’ इलेक्ट्रिक व्हीलचेअर प्रदान करण्यात आली आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून आर्थिक पुनर्वसनाच्या दिशेने पुन्हा प्रयत्न करण्यास नवी ऊर्जा मिळणार आहे.
दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ढेपसे यांनी कोतवडे येथे स्वतःचे टू-व्हीलर रिपेअरिंग गॅरेज सुरू केले होते; मात्र, २०१२ मध्ये मज्जारज्जूच्या समस्येमुळे त्यांच्या दोन्ही पायांतील ताकद पूर्णपणे गेली आणि ते बिछान्याला खिळून राहिले. २०१५ मध्ये ‘आरएचपी फाउंडेशन’चे अध्यक्ष नाकाडे यांनी त्यांची भेट घेऊन मुंबईतील हाजीअली रुग्णालयात उपचारासाठी मार्गदर्शन केले. तेथे पाच महिने उपचार घेतल्यानंतर त्यांनी व्हीलचेअरच्या सहाय्याने स्वतःची कामे स्वतः करण्याचे कौशल्य आत्मसात केले. घरी परतल्यानंतर ते मुलगा शुभम याच्या मदतीने पुन्हा गॅरेजच्या कामावर लक्ष ठेवू लागले; परंतु त्यात त्यांना काही अडचणी येत होत्या; मात्र ‘आरएचपी फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांना ‘निओमोशन'' इलेक्ट्रिक व्हीलचेअर’ प्रदान करण्यात आली आहे. या साहाय्यामुळे ढेपसे यांना पुन्हा घराबाहेर पडणे, गॅरेजमध्ये जाणे आणि संवाद साधणे सोपे होणार असून त्यांच्या स्वावलंबनाला नवी ऊर्जा मिळाली आहे. व्हीलचेअर सुपूर्द करताना आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे यांच्यासह मयूरी ढेपसे, शिवन्या ढेपसे, शुभम ढेपसे, स्वराज ढेपसे व श्रीजा ढेपसे उपस्थित होते.
---
परिस्थितीत केली मात
ढेपसे यांना २०२५ मध्ये बेडसोरचा त्रास झाला आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या परिस्थितीत त्यांना सहजरित्या वावरण्यासाठी ‘निओमोशन’ इलेक्ट्रिक व्हीलचेअरची अत्यंत गरज होती. वयोमर्यादेच्या तांत्रिक अडचणीमुळे अधिकृत योजनेतून त्यांची निवड होऊ शकली नाही; मात्र गरज ओळखून आरएचपी फाउंडेशनने देणगीदारांच्या सहकार्याने त्यांना ही इलेक्ट्रिक व्हीलचेअर उपलब्ध करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan News: शहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का! पाकिस्तानातील २५ मंत्रालये बनावट; तातडीने बरखास्त करण्याची शिफारस

ऑनलाईन शॉपिंग कंपनी Meesho वर गुन्हा दाखल! मुलाच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी आईला सापडला धक्कादायक पुरावा

Mumbai Crime: १७ वर्षीय पुतण्यानेच काकाचा जीव घेतला, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला, तक्रारदार बनून पोलिसात गेला पण...

iPhone 17 Pro Max वर बंपर डील! 1.47 लाखांचा फोन फक्त 77,800 रुपायांमध्ये; जाणून घ्या काय आहे ऑफर?

Latest Marathi News Live Update: मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर

SCROLL FOR NEXT