‘स्वरतरंगिणी’तून राष्ट्रभक्तीचा जागर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः राष्ट्रसेविका समितीच्या ९०व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून कोकण प्रांताच्यावतीने विशेष ‘स्वरतरंगिणी’ घोषवादन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. १६) पतितपावन मंदिर येथे करण्यात आले होते. कोकण प्रांतातील नऊ जिल्हे आणि एका महानगरामध्ये साखळी पद्धतीने हे घोषवादन पार पडले. या कार्यक्रमाला १८५ जणांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संगीत शिक्षिका विनया परब तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. रंजना केतकर उपस्थित होत्या. या वेळी व्यासपीठावर कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर आणि जिल्हा कार्यवाहिका मीरा भिडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. केतकर यांनी समितीच्या ९० वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ‘१००व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक सेविका ही वटवृक्षाच्या पारंबीसारखी आहे. अभ्यासाने, अनुभवाने आणि अनुसरणाने तिने स्वतःचा वृक्ष बनवला पाहिजे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्र सर्वोपरी हा भाव समाजात रुजविण्यासाठी सक्षम मातृशक्ती जागृत व संघटित करण्याचे काम समिती करत असल्याचे त्यांनी नमूद केले. समितीचे ९०वे वर्ष ‘घोष’ (वाद्यवृंद) विषयाला समर्पित असून, सांघिकता, समरसता व शिस्तबद्धतेच्या तालावर भारतीय शास्त्रीय संगीत आणि राष्ट्रभक्तिपर सुरावटींच्या वादनाने उपस्थितांमध्ये देशभक्तीची चेतना निर्माण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.