श्रावणात एसटीकडून तीर्थस्थळ दर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : श्रावण महिना सुरू झाल्याने भाविकांमध्ये देवदर्शनाची लगबग वाढली आहे. हे लक्षात घेऊन राज्यमार्ग परिवहन महामंडळाने एसटीसंगे तीर्थाटन ही विशेष पॅकेज टूर योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे सर्वसामान्य भाविकांना सवलतीच्या दरात विविध तीर्थस्थळांचे दर्शन घेता येणार असून, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधाही उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी रत्नागिरी विभागातील नऊ आगारांतून विविध तीर्थक्षेत्रांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
‘एसटीसंगे तीर्थाटन’ टूरसाठी मार्लेश्वर, गणपतीपुळे, कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर या प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा समावेश केला आहे. भाविकांच्या मागणीनुसार तसेच उपलब्धतेनुसार या तीर्थाटन सहलींचे नियोजन करण्यात येणार आहे. एसटीच्या विविध सवलती लागू असणार आहेत. महिला आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत मिळणार आहे तर ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. रत्नागिरी विभागात गेल्या चार महिन्यांत ‘एसटीसंगे तीर्थाटन’ योजनेंतर्गत १५३ गाड्या सोडण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.