- rat२०p३.jpg-
26O58426
रत्नागिरी ः रत्नदुर्ग किल्ला परिसरात देशी वृक्षांची लागवड करताना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी.
---
बीजगोळ्यांतून रत्नदुर्गावर हिरवाईचा संकल्प
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय; वृक्ष संवर्धनाचा दिला संदेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्यावतीने रत्नदुर्ग किल्ला परिसरात भगवती मंदिराजवळ ‘बीजगोळे प्रसार व बीज लागवड’ उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमात वनस्पतिशास्त्र विषयाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रत्नदुर्ग किल्ला परिसरात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात वनस्पतिशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत फणस, मोह, चिंच, रिठा आणि आंबा या स्थानिक व देशी वृक्षांच्या बियांचे बीजगोळे तयार करून किल्ला परिसरातील योग्य ठिकाणी त्यांचा प्रसार करण्यात आला. तसेच काही ठिकाणी बियांची थेट लागवडही करण्यात आली. देशी वृक्षांचे संवर्धन, स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण आणि किल्ला परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. ‘बीज पसरवा, निसर्ग फुलवा!’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून देशी वृक्षांचे महत्त्व आणि जैवविविधता संवर्धनाची गरज समजावून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन गुरव यांनी केले. भगवती मंदिर परिसरात बीज लागवडीसाठी प्रा. शरद आपटे, डॉ. विराज चाबके आणि प्रियांका शिंदे-अवेरे यांनी स्वतः सहभाग घेत बीज लागवड केली.
---
समृद्ध वनसंपदेची सुरवात
देशी वृक्षांच्या बियांचा प्रसार करून त्यांच्या नैसर्गिक पुनरुत्पादनाला चालना देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रति जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. आज पेरलेले बीज भविष्यातील समृद्ध वनसंपदेची सुरवात ठरेल, अशी आशा या वेळी व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.