कोकण

कुणकेश्वर दर्शनासाठी राजापूरातून 22 रोजी पदयात्रा

CD

कुणकेश्वरच्या वाटेवर भक्तीचा जागर
राजापुरातून उद्या पदयात्रा; हर हर महादेव मित्रमंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २०ः हर हर महादेव मित्रमंडळातर्फे दुसऱ्या श्रावण सोमवारी (ता. २४) श्री देव कुणकेश्वर दर्शनासाठी राजापूर ते कुणकेश्वर अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेचे हे बारावे वर्ष असून, या पदयात्रेत सुमारे १०० भक्तगण सहभागी होणार असून, २२ ते २४ अशी ही तीन दिवसांची पदयात्रा आहे.
शनिवारी (ता. २२) सकाळी ७.३० वा. या पदयात्रेला प्रारंभ होईल. राजापूर शहरातील जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर राजापूर ते पुढे शेढे येथे अल्पोपाहार, तेथून पुढे येथे रामूशेठ पेडणेकर यांच्यावतीने मयेकर मांगर येथे भाविकांना अल्पोपाहार, तेथून पुढे पडेल कॅन्टीन यथे चहा-नाष्टा व रात्री ८ वा. पुढे वाडा येथे श्री देव रवळनाथ मंदिरात मुक्काम. या ठिकाणी रात्रीचे जेवण वाडा ग्रामस्थ, परब, वाडेकर बंधूकडून केली जाणार आहे. २३ रोजी सकाळी ७. ३० वा. वाडा येथे अल्पोपाहार घेऊन पुढे कुणकेश्वरकडे प्रयाण केले जाणार आहे. दुपारी २ वा. ही पदयात्रा कुणकेश्वर येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी तेली बंधूंकडून भाविकांना जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे तर २४ रोजी सकाळी मंदिरात काकड आरती, पूजा, अभिषेक कार्यक्रमात सहभाग, याचवेळी श्री देव कुणकेश्वर मंदिरात या पदयात्रेतील भाविकांना सकाळी ८ ते ९ वा. भजन करण्याची संधी देण्यात आलेली असून, या ठिकाणी पदयात्रेत सहभागी असणारे बाईत मंडळींचे ढोलावरचे भजन होणार आहे. त्यानंतर प्रसाद घेऊन भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

SCROLL FOR NEXT