Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

Virender Sehwag Son Video Viral: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरही क्रिकेटमध्ये करियर घडवत आहे. सध्या तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळत असून त्याने मारलेल्या एका शॉटने सर्वांनाच वीरेंद्र सेहवागची आठवण झाली.
Virender Sehwag - Aaryavir Sehwag

Virender Sehwag - Aaryavir Sehwag

Sakal

Updated on

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) स्फोटक फलंदाजीने क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊनही एक दशक लोटलं आहे, पण अशातच आता आणखी एका सेहवागने सर्वांचेच लक्ष वेधले आहे, तो म्हणजे १८ वर्षांच्या आर्यवीर सेहवाग.

आर्यवीर (Aaryavir Sehwag) हा सेहवागचा मुलगा असून सध्या दिल्ली प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळत आहे. त्याने नुकतेच एका सामन्यात खेळलेल्या बॅक-फुट पंचने सर्वांनाच वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली आहे.

Virender Sehwag - Aaryavir Sehwag
Virender Sehwag ने सांगितला किस्सा! ग्रेग चॅपेल यांच्यासोबत झालेला जोरदार वाद; राहुल द्रविडने मध्यस्थी केली नसती तर...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com