कोकण

कोळोशी-हडपिड हायस्कूलच्या विद्यार्थिनींकडून सैनिकांना राख्या

CD

58481
कोळोशी-हडपिड : येथील हायस्कूलच्या विद्यार्थिनी व शिक्षक.

कोळोशी-हडपिड हायस्कूलच्या
विद्यार्थिनींकडून सैनिकांना राख्या
नांदगाव, ता. २१ : शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी हडपिड मुंबई संचलित माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी- हडपिडच्या विद्यार्थिर्नींकडून सीमेवर तैनात असणाऱ्या तिन्ही दलाच्या भारतीय सैन्यांना रक्षाबंधननिमित्त राख्या पाठविण्यात आल्या.
बहिण भावाच्या पवित्र प्रेमाचा प्रतीक असणारा रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाला आपले रक्षण करण्याच्या उद्देशाने राखी बांधते; मात्र सीमेवर तैनात असणारे आपले सैनिक मात्र या दिवशी आपल्या बहिणीपर्यंत पोहोचू शकत नाहीत आपल्या कुटुंबापासून ते दूर असतात. अशावेळी आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ज्यांच्यामुळे आम्ही आनंदाने खेळू बागडू शकतो, निर्धास्तपणे झोपू शकतो अशा सर्व सैनिक बांधवांना आणि भगिनींना आम्ही राखी पाठवणार हा विचार जाहीर करून आज त्याप्रमाणे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांच्या जवानांसाठी राख्या पाठविल्या. सर्व सैनिकांनी स्वतः सुरक्षित राहून देशाचे संरक्षण करावे. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो, असा संदेशही या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Nutritious Diet : शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त अन्नधान्य येत असल्याचे ग्रामस्थांचे आरोप; काळवाडी ग्रामस्थांचा पोषण आहारावर बहिष्कार

श्वेता तिवारीच्या तक्रारीनंतर ऑनलाइन डिलिव्हरीवर प्रश्नचिन्ह, तुकाराम मुंढे काय अ‍ॅक्शन घेणार?

Marathi News Live Updates : दिल्ली विद्यापीठाने चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थेट पीएचडी प्रवेशाची सुविधा जाहीर केली

Baramati Accident : बारामतीनजिक हायवाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी...

Nirgudsar News : व्हिडिओ चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास मारहाण

SCROLL FOR NEXT