कोकण

आरती स्पर्धा

CD

नाभिक समाजबांधवांसाठी
आरती गायन स्पर्धा
चिपळूण : संत श्री सेना महाराज प्रतिष्ठानतर्फे तालुक्यातील नाभिक समाजबांधवांसाठी संत श्री सेना महाराज आरती गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी गणपतीची एक आणि संत श्री सेना महाराज यांची एक, अशा आपल्या पसंतीच्या दोन आरत्या सादर करायच्या आहेत; मात्र परीक्षण केवळ संत श्री सेना महाराज यांच्या आरतीचे करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी मोबाईल आडवा धरून दोन्ही आरत्यांचा कमाल सात मिनिटांचा एकच सलग व्हिडिओ तयार करून पाठवायचा आहे. व्हिडिओमध्ये कट, एडिटिंग अथवा वेगवेगळे भाग जोडलेले नसावेत. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येणार आहे. स्पर्धेची अंतिम प्रवेशिका पाठवण्याची तारीख २८ सप्टेंबर आहे. व्हिडिओ केवळ व्हॉटसॲपच्या माध्यमातून पाठवावा. स्पर्धेसाठी नावनोंदणी व नियमावलीच्या माहितीसाठी अध्यक्ष रमाकांत पवार आणि कार्यकारिणी सदस्य दिलीप जाधव यांच्याशी संपर्क साधावा.


अनिरूद्ध, आदित्य
जिल्हा क्रिकेट संघात
गावतळे ः महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित ८व्या अंडर १७ राज्यस्तरीय स्पर्धेत दापोलीतील गावतळे गावचे सुपुत्र अनिरुद्ध पवार व आदित्य गुरव या दोघांची रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली आहे. अहिल्यानगर येथील राहुरी येथे या स्पर्धा होणार असून, २१ ऑगस्टला रत्नागिरीचा पहिला सामना होणार आहे. अनिरुद्ध हा अष्टपैलू खेळाडू असून, आदित्य हा वेगवान गोलंदाज आहे. तसेच गावतळे गावचे सुपुत्र रूद्र पवार याची याच स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा संघात निवड झाली आहे.


रत्नागिरीत रविवारी
एकादशी कीर्तनसेवा
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि रत्नागिरी कीर्तनकार मंडळातर्फे एकादशी कीर्तनसेवा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी येथील अध्यात्म मंदिर येथे रविवारी (ता. २३) मयूरी जोशी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या एकादशी कीर्तनसेवेला उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ व रत्नागिरी कीर्तनकार मंडळाने केले आहे. हे कीर्तन अध्यात्म मंदिर येथे सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत होईल.


सद्भावना दिवसानिमित्त
कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
रत्नागिरी ः भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामाजिक सामंजस्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करत, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज ‘सद्भावना’ दिवसानिमित्त सामूहिक शपथ घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नायब तहसीलदार संजय भिसे यांनी उपस्थितांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AB de Villiers: "सचिन तेंडुलकरपेक्षा विराटच कसोटीत भारी..." डिव्हिलियर्सच्या सनसनाटी दाव्याने खळबळ

Junnar Protest: पिंपळवंडीतील दहा वर्षीय मुलीवरील अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जुन्नरमध्ये महिलांचा मूक मोर्चा

Onion Prices: कांद्याला समाधानकारक दर; तीन वर्षांच्या तोट्यातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

Latest Marathi News Live Update: दिल्ली लाठीचार्जप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन

JPSC-JSSC परीक्षांवरून मोठा ट्विस्ट! भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय थांबवला; झारखंड सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT