swt२०२९.jpg
५८५३२
पाडलोस : गावातील सत्कारमूर्तींसह उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
पाडलोस ग्रामपंचायतीतर्फे सन्मान सोहळा
विविधक्षेत्रात योगदान : शेतकरी, उद्योजक, माजी सैनिकांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ : पाडलोस ग्रामपंचायतच्या वतीने शेती व्यवसाय तसेच शेतीपूरक उद्योगांना चालना देणाऱ्या प्रगतशील शेतकरी, उद्योजक, महिला व्यावसायिक आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. गावातील तरुणांनी गावातच स्वरोजगाराच्या संधी निर्माण करून इतरांसमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत व कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणारे सुनील गावडे व सागर गावडे, शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय सुरू ठेवणारे मुकुंद गावडे यांचा गौरव करण्यात आला. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या सुनिता पाडलोसकर, मनीषा पाडलोसकर, सुशीला हरिजन, धनश्री पाडलोसकर व सरिता पाडलोसकर, तसेच घरोघरी फिरून दागिन्यांच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या लक्ष्मी देसाई यांचाही सन्मान करण्यात आला.
दुग्ध व्यवसाय करणारे विजय दिगंबर गावडे, महादेव गावडे, प्रशांत माधव, अनुराज गावडे, विजय अनंत गावडे, अरुण गवस व चंद्रकांत गावडे यांचा गौरव करण्यात आला. काकडी-भेंडी उत्पादन करून विक्री करणारे भूषण केणी, अमोल कोरगावकर व संजय नाईक, तसेच प्रगतशील शेतकरी विष्णु कृष्णा गावडे व सुरत गावडे यांचा सत्कार करण्यात आला. बचत गटांच्या माध्यमातून भांडी विक्री व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मी गावडे, कृषी साहित्य विक्री करणारे प्रणित गावडे आणि भाजीपाला विक्री करणाऱ्या जानकी गावडे, अनिता सावंत, गायत्री नाईक, विलासिनी गावडे, माधुरी गावडे व सीमा पाडलोसकर यांचाही सन्मान करण्यात आला.
माजी सैनिक नीलेश गावडे यांनी निवृत्तीनंतरही बांबू व शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडक्यांना पडदे लावण्यासाठी मदतीचा हात दिल्याबद्दलही त्यांचा सन्मान करण्यात आला. २०२६-२७ या आर्थिक वर्षात जुलै २०२६ पर्यंत कर भरणाऱ्या करदात्यांना पाच टक्के ग्रामपंचायत करसवलतीचा प्रसार करण्यासाठी रिल्सद्वारे जनजागृती करणारे पाडलोस सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक व छाया नाईक यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, राजू शेटकर, रोशनी गावडे, विनायक परब, लिंगाजी पाडलोसकर, प्रतीक्षा गावडे, तलाठी सुप्रिया शेळके, पोलिस पाटील रश्मी माधव, विश्वनाथ नाईक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी केले. आभार उपसरपंच राजू शेटकर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.