58541
‘बांदा रोट्रॅक्ट’ गरजवंतांना
ठरते वरदान ः प्रणय तेली
बांदा, ता. २२ ः ‘‘येथील ‘रोट्रॅक्ट’चे काम समाजाला दिशा देणारे आहे. तरुण रोट्रॅक्टर्सच्या धडपडीमुळे बांदा परिसरातील अनेक गरजवंतांना वेळेवर मदत मिळाली असून, समाजासाठी ही युवाशक्ती खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे,’’ असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट-३१७० चे सेक्रेटरी प्रणय तेली यांनी केले. येथे आयोजित पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.
येथील रोट्रॅक्ट क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात झाला. आगामी वर्षासाठी अध्यक्षपदी डॉ. मिताली सावंत, सचिवपदी संकेत वेंगुर्लेकर, तर खजिनदारपदी मयूर मसुरकर यांची बिनविरोध निवड केली. क्लबने वर्षभरात ८५ हून अधिक यशस्वी सामाजिक प्रकल्प राबवून सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविला आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत मदत पोहोचविण्यासह समाजोपयोगी कार्यात क्लबने उल्लेखनीय योगदान दिल्याचे यावेळी सांगितले. विभाग अध्यक्ष अमेय वरेरकर यांनीही रोट्रॅक्ट क्लब बांदाच्या कार्याचे कौतुक केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार झाला. यावेळी माजी अध्यक्ष रोहन कुबडे, सिंधुदुर्ग झोन अध्यक्ष निकिता अराबेकर, बांदा रोटरी अध्यक्ष स्वप्नील धामापूरकर आदी उपस्थित होते. मेहेक शेख यांनी सूत्रसंचालन केले. संकेत वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.