- rat२१p१३.jpg-
P26O58681
रत्नागिरी ः शिष्यवृत्तीत गुणवत्ता यादीत चमकलेले जीजीपीएसचे विद्यार्थी.
---
गुणवत्ता यादीत चमकलेल्या
जीपीपीएसच्या विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ च्या निकालात जीजीपीएस प्रशालेतील ३० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून, या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास र. ए. सोसायटीचे सचिव सतीश शेवडे, प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष सुहास पटवर्धन, डॉ. केतकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर, गुरूकुल विभागप्रमुख वासुदेव परांजपे आणि शुभदा पटवर्धन यांची उपस्थिती होती. ५वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले, ज्याला शिक्षक विजय रानडे आणि नितीन लिमये यांनी संगीतसाथ दिली. ४थीत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये शौर्य कोवळे, अनन्या देवरूखकर, शौर्य पवार, भार्गव राऊळ, मनवा कवठणकर यांचा समावेश आहे. ५वीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये सृष्टी पाटील, स्वरा पवार, अथर्व सारदळ, स्वरा आग्रे, कनक सातवेकर, शौर्या देसाई, मिहिरा कांबळे, साध्वी साळुंखे, खुशी पाटील तर ७वी शहरी सर्वसाधारण यादीत शिवम पाटील, श्लोक तारवे, सान्वी पालवणकर, चैत्राली कुलकर्णी, आराध्या शिंदे, आराध्या कुलकर्णी, सोहम चव्हाण, श्रीरंग आयरे, राधेय मुळ्ये यांचा समावेश आहे. ८वीच्या यादीत श्रीतेज माळी, सोहम आग्रे, आर्य पवार, शल्वि शिवगण, चैतन्य नवरे, तनिष मायनाक यांचा समावेश आहे. अक्षया सावंत व वैदेही सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.