58687
सावंतवाडी : येथे अधिकाऱ्यांना निवेदन देताना गुरु कल्याणकर व प्रशांत बांदेकर.
अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या
सावंतवाडी तालुक्यातील प्रकार; कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ : सावंतवाडी तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाड्यांमधून सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या ‘टेक होम राशन’ पूरक पोषण आहाराच्या दर्जाबाबत अत्यंत गंभीर आरोप समोर आले आहेत. या पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये आणि धान्यामध्ये अळ्या, किडे व बुरशी आढळून येत असून, अन्नपदार्थांमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचा दावा लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केला आहे. बालकांच्या आरोग्याशी खिलवाळ करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर आणि बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी सावंतवाडी तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी, अन्न व औषध प्रशासन तसेच तालुका अन्न सुरक्षा अधिकारी किरण गावीत यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे जिल्ह्यातील असा संपूर्ण संशयास्पद साठा तात्काळ जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याची मागणी केली आहे. तसेच निकृष्ट व दूषित अन्न पुरवणाऱ्या पुरवठादाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकावे आणि भविष्यात असा प्रकार टाळण्यासाठी पालक व ग्रामस्थांची स्थानिक देखरेख समिती स्थापन करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
---
आंदोलन छेडण्याचा इशारा
बालकांच्या आरोग्याशी संबंधित विषयात प्रशासनाने पुढील सात दिवसांत दोषींवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा गुरु कल्याणकर व प्रशांत बांदेकर यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला व बालविकास विभागाच्या उपआयुक्त यांच्याकडेही पाठवल्या असून आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.