केळूस विठ्ठल रखुमाई मंदिरात सप्ताह
कुडाळ : बापडतेवाडी-केळूस येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २३ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. सकाळी नऊ वाजता वीणा पूजन, समई पूजन व जयघोषाने सप्ताहाचा प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजता श्री. संदेश सामंत (झाराप) यांची श्रीचरणी सेवा, दुपारी तीन वाजता विलास रेवंडकर व सहकारी (मुणगी) यांचा हरिपाठ, सायंकाळी सात वाजता श्रींची आरती होईल. त्यानंतर रात्री ७.३० वाजता श्री ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ (मोबारवाडी-केळूस), रात्री ८.३० वाजता श्री महाविष्णू प्रासादिक भजन मंडळ (आवेरा), रात्री ९.३० वाजता श्री तारादेवी भगवती प्रासादिक भजन मंडळ (केळूस), रात्री ११ वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ (आंदुर्ले) आणि मध्यरात्री १२ वाजता श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ (बापडतेवाडी-केळूस) यांचे भजन होईल. पहाटे तीन वाजता श्री महापुरुष भजन मंडळ (निवती) यांची काकड आरती होईल. पहाटे ६.१५ वाजता नामसप्ताहाची सांगता होणार आहे. केळूस पंचक्रोशीतील भाविक, भक्त व उपासकांनी या भक्तिमय नामजप सोहळ्यात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई सेवा समिती, बापडतेवाडी-केळूस यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.