कोकण

कृषी विभागाच्या योजनांची कृषिदूतांनी घेतली माहिती

CD

58896

कृषी विभागाच्या योजनांची
कृषिदूतांनी घेतली माहिती
ओरोस, ता. २२ : कृषी क्षेत्रातील शासकीय योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी अभिमुख उपक्रमांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी कुंदे गावातील कृषिदूतांनी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागाला भेट दिली. यावेळी जिल्ह्यात विविध गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी योजना, प्रात्यक्षिके आणि शाश्वत शेतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
कृषिदूत मानस पाटील, सिद्धार्थ भोसले, राहुल राठोड, पृथ्वीराज मदने आणि तेजस माळी यांचा या अभ्यास भेटीत सहभाग होता. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आणि शाश्वत शेतीचा प्रसार करणे या उद्देशाने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. या भेटीदरम्यान फळबाग लागवड, जैविक शेती, आधुनिक सिंचन पद्धती, तसेच स्थानिक हवामानाला अनुकूल पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. कृषिदूतांनीही या योजनांची माहिती गावपातळीवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने उपक्रमांचा आढावा घेतला.

Cold Medicine: पालकांनो लक्ष द्या! ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची ‘ही’ औषधं देऊ नका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

HARISHCHANDRA BIRAJDAR: २० किलो वजनाचा फरक तरीही आव्हान स्वीकारलं; १४ मिनिटांत सतपाल सिंगला चीतपट करणाऱ्या बिराजदार मामांची गाजलेली कुस्ती

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद! महाराष्ट्रात कधी सुट्टी? रक्षाबंधनला बँका सुरू? पाहा RBI ची अपडेट

Maratha Reservation : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिष्ठाई निष्फळ; मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका

SCROLL FOR NEXT