कोकण

निकृष्ट धान्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ कसा?

CD

58899
सावंतवाडी ः पंचायत समितीची सभा


निकृष्ट धान्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह?’

पंचायत समिती सभेत संताप; शासकीय, खासगी लॅबमध्ये तपासणीचा ठराव

सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. २२ ः शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याचा मुद्दा मागील बैठकीत सदस्य जितेंद्र गावकर यांनी उपस्थित केल्यानंतर शुक्रवारी (ता. २१) झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत त्या निकृष्ट धान्याचा लॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरून पुन्हा गाजला. ‘‘हा लॅब रिपोर्ट अमान्य आहे, असा ठराव घेण्यात येईल. शिवाय ते धान्य पुन्हा शासकीय व खासगी लॅबमध्ये तपासले जाईल,’’ अशी ग्वाही सभापती सुस्मिता जाधव यांनी दिली.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा येथील तालुका स्कूल इमारत सभागृहात सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी नीलेश जाधव उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच इतिवृत्त वाचनात मागच्या सभेतील निकृष्ट धान्याबाबतचा विषय आला. यावर, ते धान्य लॅब रिपोर्टमध्ये खाण्यायोग्य असल्याचे गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांनी स्पष्ट केले. यावर, सदस्य गावरकर पुन्हा आक्रमक झाले. ‘‘सभागृहात प्रत्यक्ष दाखवलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि किडलेले असताना, कागदावर ते ‘चांगले’ कसे काय ठरवले,’’ असा थेट प्रश्‍न त्यांनी केला. सदस्यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला. ‘‘अशा निकृष्ट धान्यामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असताना आम्ही त्यांना शाळेत कसे पाठवायचे? हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही,’’ असा इशारा गावकर यांनी दिला. सदस्यांनी देखील या मुद्द्यावरून शिक्षण विभागाला धारेवर धरले. सभापती जाधव यांनी यात हस्तक्षेप करत ते निकृष्ट धान्य पुन्हा लॅबला पाठवले जाईल, त्याची पुन्हा तपासणी करून घ्यावी, असे आदेश दिले.
---
‘ठेकेदाराला काळ्या यादीत टाका!’
नाणोस पुलाला तडे गेल्याच्या प्रश्नावर उपअभियंता अजित पाटील यांनी ठेकेदाराला नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. तज्ज्ञ टीमच्या अहवालानंतर त्याची डागडुजी केली जाईल, अशी माहिती दिली. यावर, उपसभापती मुळीक यांनी पूल नवीन उभारून द्यावा, अशी मागणी केली. यावर निधीची तरतूद करून प्रस्ताव सादर करण्याचा ठराव घेतला. उपसभापती मुळीक यांनी झाराप महामार्गाचे काम देखील निकृष्ट पद्धतीने झाल्याचे सांगत ‘ठेकेदाराला पुढील बैठकीस बोलवा,’ असे आदेश दिले, तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सदस्यांनी केली.
---
अभिनंदनाच्या श्रेयावरून कलगीतुरा
सावंतवाडी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटल्याबद्दल माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी सदस्य मायकल डिसोजा यांनी केली. तिला उपसभापती मुळीक यांनी आक्षेप घेत, राजघराण्याने मोफत जागा दिली आहे. त्यामुळे राजघराण्याच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, असे सुचवले. यावर सभापती सुस्मिता जाधव यांनी दोघांचेही अभिनंदन ठराव घेऊ, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Medicine: पालकांनो लक्ष द्या! ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची ‘ही’ औषधं देऊ नका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

HARISHCHANDRA BIRAJDAR: २० किलो वजनाचा फरक तरीही आव्हान स्वीकारलं; १४ मिनिटांत सतपाल सिंगला चीतपट करणाऱ्या बिराजदार मामांची गाजलेली कुस्ती

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद! महाराष्ट्रात कधी सुट्टी? रक्षाबंधनला बँका सुरू? पाहा RBI ची अपडेट

Maratha Reservation : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिष्ठाई निष्फळ; मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका

SCROLL FOR NEXT