कोकण

शहर होणार अधिक प्रकाशमान

CD

रस्ते उजळणार, शहर चमकणार!

चिपळूण शहरासाठी २६२ सोलर पथदीपचा प्रस्ताव ; जागा निश्चितीवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः शहरातील विविध प्रभागांमध्ये २६२ सोलर पथदीप आणि १५ सोलर हायमास्ट बसवण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत चिपळूण शहर अधिक प्रकाशमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पथदिपांसाठी जागा निश्चित करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
नगरपालिकेची सभा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात २७ रोजी होणार आहे. याच सभेत शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासह वृक्षसंवर्धनासाठी समिती स्थापन करण्याचा विषयही चर्चेला येणार आहे. तत्पूर्वी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चिपळूण शहरातील विविध भागांमध्ये पथदीप आणि हायमास्टची आवश्यकता लक्षात घेऊन विद्युत विभागाने पाहणी केली. त्यानंतर २६२ सोलर पथदीप आणि १५ सोलर हायमास्ट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिव्यांसाठी जागा निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. शहरात नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी वृक्षसंवर्धन समिती स्थापन करण्याचाही निर्णय प्रस्तावित आहे. शहरातील विविध विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अन्य नागरी सुविधांशी संबंधित विषयांवरही सभेत चर्चा होणार आहे. सोलर पथदीप आणि हायमास्टमुळे शहरातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्यावेळी प्रकाशव्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीच्यादृष्टीनेही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
---
अतिक्रमणांवर कारवाई
शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे पादचारी तसेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या कडेला अनधिकृतपणे जागा व्यापली जात असल्याने वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात काल नेमकं काय घडलं? COEP तील गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी जारी केलं निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी

Omi Kalani: महापौर माझ्या म्हणण्यानुसार काम करतात, ओमी कलानी यांचा थेट दावा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : काँग्रेस नगरसेवकांसोबत बैठक संपली, राहुल गांधी कार्यक्रमस्थळी रवाना

Nasrapur Agitation : पुणे-सातारा महामार्गावर कापुरव्होळ येथे उद्या रास्ता रोको आंदोलन; पोलिसांकडुन प्रवाशांना पर्यायी मार्गाचे वापराचे अवाहन

Cold Medicine: पालकांनो लक्ष द्या! ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची ‘ही’ औषधं देऊ नका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT