स्वखर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे!
लांज्यातील लांजेकर, नेवरेकरांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २२ ः शहरातील दर्गा रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी व गैरसोय होत होती. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर आणि पाणी सभापती गुल्या नेवरेकर यांनी स्वखर्चाने खडी टाकून हे खड्डे बुजवले असून, रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला आहे.
दर्गा रोडवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे वाहन चालवताना चालकांची कसरत होत होती तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. या दुरवस्थेविरोधात १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला होता. नागरिक आणि विद्यार्थ्यांची होणारी दैनंदिन हेळसांड थांबवण्यासाठी उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर व पाणी सभापती गुल्या नेवरेकर यांनी पुढाकार घेतला. शुक्रवारी त्यांनी स्वतःच्या खर्चाने खडी मागवून रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजवून घेतले. लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेबद्दल व सामाजिक बांधीलकीबद्दल लांजा शहरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.