कोकण

गणेशोत्सवात वेंगुर्लेतील वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’

CD

58949

गणेशोत्सवात वेंगुर्लेत वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’

अवजड वाहनांना पर्यायी मार्ग; स्वतंत्र पार्किंग, बाजारपेठेत वन-वे; मालवाहतुकीसाठी वेळेचे बंधन


सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता.२२ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी नगरपरिषदेने विविध उपाययोजना आखल्या आहेत. अवजड वाहनांना पर्यायी मार्ग, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, बाजारपेठेत वन-वे तसेच मालवाहू वाहनांसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक, पार्किंग, बाजारपेठेतील नियोजन, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेतर्फे सभा घेऊन सविस्तर नियोजन करण्यात आले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या या नियोजन बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, पोलिस, तहसील कार्यालय, महावितरण, आरोग्य विभाग, एस.टी. महामंडळ, रिक्षा संघटना तसेच नागरिक उपस्थित होते.
गणेशोत्सवात शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन चारचाकी, दुचाकी, तीनचाकी व मालवाहू वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी गणेश कॉम्प्लेक्स, शाळा क्रमांक १, सिद्धिविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय, पाटील सेंटर, लता अपार्टमेंट तसेच महालक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोरील मोकळ्या जागेचा विचार करण्यात आला आहे. दुचाकी वाहनांसाठी वेंगुर्लेकरवाडी व रामेश्वर मंदिर परिसर, तर मालवाहू तीनचाकींसाठी सप्तसागर ते मारुती मंदिर परिसराचा वापर करण्याचे नियोजन आहे. मोठ्या वाहनांसाठी सागररत्न मत्स्यबाजारासमोरील मोकळी जागा, सप्तसागर, रामेश्वर मंदिर, मराठी शाळा क्रमांक १ चे पटांगण आदी ठिकाणांचा वापर करण्याचे नियोजन केले.
गणेशोत्सव कालावधीत १० ते २६ सप्टेंबर या कालावधीत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. हॉस्पिटल नाका ते दाभोली नाका या मुख्य मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करून त्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याच काळात एसटी बसचा थांबा दरवर्षीप्रमाणे रामेश्वर मंदिराजवळ ठेवण्याचे नियोजन केले आहे. रामेश्वर मंदिर व हॉस्पिटल नाका येथे एसटी महामंडळाकडून कर्मचारी नियुक्त करण्याची सूचना केली आहे.
गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या माटवीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने १२ व १३ सप्टेंबर दरम्यान बॅ. खर्डेकर रोडवरील मारुती मंदिर ते दाभोली नाका या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ व्यापाऱ्यांना माटवीचे साहित्य विक्रीसाठी जागा देण्यात येणार आहे. रिक्षांसाठी मुख्य बाजारपेठेत एकेरी मार्गाची (वन-वे) व्यवस्था करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनानंतर पाच दिवसांनी याच मार्गावर चारचाकी वाहनांसाठीही एकेरी वाहतुकीची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात शहरातून जाणाऱ्या खासगी बसना शहरातील रस्त्यांवर थांबण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. खासगी बससाठी मानसीश्वर उद्यानासमोरील मोकळी जागा आणि कॅम्प येथील स्टेडियमशेजारील मोकळी जागा या दोन ठिकाणीच थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
...
चौकट
मालवाहू गाड्यांसाठी वेळ निश्चित
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही वेळ निश्चित केली आहे. १० ते २६ सप्टेंबरदरम्यान रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेतच मालवाहू वाहनांना शहरात मालवाहतूक करता येणार आहे. इतर दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मालवाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे.
--
कोट
गणेशमूर्ती मातीच्या अथवा शाडू मातीच्या असाव्यात. सजावटही पर्यावरणपुरक असावी. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करू. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपजिल्हा रुग्णालयामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडून एसटी बसस्थानक येथे पथक उपलब्ध करून देण्याचीही सूचना केली.
- दिलिप गिरप, नगराध्यक्ष, वेंगुर्ले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात काल नेमकं काय घडलं? COEP तील गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी जारी केलं निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी

Omi Kalani: महापौर माझ्या म्हणण्यानुसार काम करतात, ओमी कलानी यांचा थेट दावा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : काँग्रेस नगरसेवकांसोबत बैठक संपली, राहुल गांधी कार्यक्रमस्थळी रवाना

Nasrapur Agitation : पुणे-सातारा महामार्गावर कापुरव्होळ येथे उद्या रास्ता रोको आंदोलन; पोलिसांकडुन प्रवाशांना पर्यायी मार्गाचे वापराचे अवाहन

Cold Medicine: पालकांनो लक्ष द्या! ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची ‘ही’ औषधं देऊ नका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT