Rat२२p१०.jpg
26O58908
तुळशी: तुळशी ग्रामपंचायत नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमांत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम, सोबत जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, प्रताप घोसाळकर, प्रणाली चिले.
-----
भाषणांपेक्षा विकासकामांवर भर!
योगेश कदम ः तुळशी ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २२ : मतदार संघात भाषणं कमी आणि कामं जास्त करायची, असा निर्णय घेतला असून त्याच शिरस्त्याने काम करत आहे; मात्र विधानसभेत मतदार संघातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी जास्त भाषण करण्याचा प्रयत्न असतो, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
तुळशी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गृहराज्यमंत्री कदम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. तुळशी येथील बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आपल्या स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही कदम यांनी दिली. मंडणगडच्या जनतेने जिल्हा परिषद निवडणुकीत २-० तर पंचायत समिती निवडणुकीत ४-० असा शंभर टक्के कौल देत शिवसेनेवरील विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासाची आणि जबाबदारीची जाणीव ठेवून मंडणगड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, अनुष्का पिचुर्ले, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, शिवसेना विभागप्रमुख संजय शेडगे, इरफान बुरोंडकर, युवासेना तालुकाध्यक्ष विकास पवार, उद्योजक संदेश चिले, नगरसेवक विनोद जाधव, चेतन सातोपे, शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे, अभय पिचुर्ले आदी उपस्थित होते.
---
ग्रामीण रुग्णालयाला ५० बेडची क्षमता
मंडणगड ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला ५० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा असून त्यानंतर नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णालय उभारण्याचे काम मार्गी लावले जाईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.
----
पाट येथे २५० एकरांवर एमआयडीसी
मंडणगड तालुक्यात उद्योग व्यवसायांना चालना देण्याच्यादृष्टीने पाट येथे सुमारे २५० एकर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंडणगडमध्ये उद्योग सुरू करण्याबाबत उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत तयारी दर्शवली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.