कोकण

गायन स्पर्धेत परेश आंब्रे

CD

गायन स्पर्धेत परेश आंब्रे प्रथम
चिपळूण : स्वरसंगम म्युझिक प्रस्तुत मनिष पाले आयोजित आवाज कोकणचा ही जिल्हास्तरीय गायन स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत जिल्हातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये शेल्डी (ता. खेड) गावचे सुपुत्र परेश आंब्रे यांचा जिल्हात प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक सिद्धी कालगुडे, तृतीय क्रमांक रोशनी बुदर/बुटके, चतुर्थ क्रमांक अक्षरा पवार, पाचवा क्रमांक प्रतीक्षा भडवळकर यांनी मिळवला.

विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत
युनायटेडचा प्रथम क्रमांक
चिपळूण : जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूल येथे झाली. या स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विज्ञान नाटिकेने प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक संकल्पना, अभिनय आणि प्रभावी संवाद यांच्या उत्कृष्ट संगमातून उपस्थितांची मने जिंकली. या नाटिकेत संकल्प तांबे, अर्जुन निवळकर, स्वानंद जोशी, ओवी भावे, सई पवार आणि अवंतिका जाधव या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

जलसंधारण दिन ‘नवनिर्माण’मध्ये साजरा
रत्नागिरी ः रत्नागिरी येथील नवनिर्माण महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन साजरा करण्यात आला. अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी दिव्या वाडकर हिने पाणी या विषयावर मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी जलसंधारण दिन का साजरा केला जातो, पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश कोणी व का दिला याबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Canada Trade War: अमेरिकेचा कॅनडाला मोठा आर्थिक धक्का; ५०% टॅरिफ लागू, कार्नींचा प्रत्युत्तराचा इशारा, म्हणाले...

IND vs SL 2nd Test: कुलदीप यादव की सारांश जैन? गौतम गंभीरच्या एका वक्तव्याने वाढलं सस्पेन्स; दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा मोठा निर्णय?

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना किती गाठी बांधायच्या असतात? जाणून घ्या यामागची खास मान्यता

Mumbai Accident: मुंबईत हिट-अँड-रनचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीला बाईकने उडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

पुण्यात काल नेमकं काय घडलं? COEP तील गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी जारी केलं निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT