-ratchl२२२.jpg-
26O58930
चिपळूण ः शिवशंभो नमन मंडळातर्फे सत्कार करण्यात आलेले कलाकार.
--------
शिवशंभो मंडळातर्फे लोककलावंतांचा सन्मान
चिपळूण ः संगमेश्वर येथील शिवशंभो नमन नाट्य मंडळातर्फे आयोजित नमन लोककला सम्राट पुरस्कार सोहळ्यात नमन लोककलेच्या संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. शहरातील मार्कंडी येथील वनविभागाच्या हॉलमध्ये हा सोहळा झाला. या निमित्ताने शाहीर जितेंद्र महाडिक यांच्या माध्यमातून सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवशंभो नमन मंडळाचा समारोप आणि लोककलेत योगदान देणाऱ्या कलाकारांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. कार्यक्रमाला दिनेश कुडतरकर, महेंद्र महाडिक, उमेश महाडिक, संतोष हातीसकर, जान्हवी महाडिक, कलाकार बाबा तटकरे, दीपक डिके, योगेश पाचकले, अनिकेत मोरे, अमोल बाटे, अनिकेत मोरे, श्लोक देवरूखकर, शनय सुवरे, प्रांजल डिके, सोहम डिके आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.