rat२५p३.jpg-
५९०५७
सावर्डे : येथील बाजारपेठेतील राख्यांचा स्टॉल.
राखी खरेदीसाठी सावर्डे बाजारपेठेत गर्दी
२८ रोजी रक्षाबंधन; आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांनी वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २३ ः भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा प्रतीक असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने, चिपळूण तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या सावर्डे बाजारपेठेत राखी खरेदीसाठी महिलांची जोरदार गर्दी दिसत आहे. येत्या २८ ऑगस्टला असणाऱ्या रक्षाबंधनासाठी सावर्डे आणि परिसरातील बाजारपेठा पूर्णपणे सजल्या असून ग्रामीण भागातून महिला आपल्या लाडक्या भावासाठी राख्या खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
यंदा बाजारपेठेत कल्पक आणि आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सावर्डे येथील दुकानांमध्ये प्रामुख्याने चकचकीत आणि उठावदार डायमंड राख्या, राजेशाही थाट असलेल्या अमेरिकन डायमंड राख्या, तरुण पिढीच्या पसंतीस उतरणाऱ्या ‘रोज गोल्ड’ राख्या आणि पारंपरिक व आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या रुद्राक्ष राख्यांना मोठी मागणी आहे. सर्व वर्गांतील ग्राहकांचा विचार करून व्यापाऱ्यांनी २० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतच्या राख्यांचा साठा उपलब्ध केला आहे. शनिवार-रविवारसह सावर्डेच्या मुख्य बाजाराच्या दिवशी ही खरेदी अधिक वाढेल आणि सणाच्या अखेरच्या दोन दिवसांत प्रचंड गर्दी होईल, अशी माहिती स्थानिक विक्रेती तन्वी चव्हाण यांनी दिली. रक्षाबंधन सणामुळे सध्या सावर्डे परिसरातील वातावरणात उत्साहाचे उधाण आले आहे.
चौकट
टपाल कार्यालयात विशेष पाकिटांना प्रतिसाद
दूर राहणाऱ्या भावांपर्यंत वेळेत राखी पोहोचावी, यासाठी टपाल विभागाने विशेष सोय केली आहे. सावर्डे उपडाकघरात राखी पाठवण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. पोस्टाने राखी सुरक्षित पोहोचवण्यासाठी १२ रुपये किमतीची खास वॉटरप्रूफ पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत. या पाकिटांना ५ रुपयांचे तिकीट लावून जलद गतीने राखी पाठवली जात आहे. या सुविधेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पोस्टमास्टर जगदीश महाडिक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.