कोकण

इको सेन्सेटिव्ह झोनला सहाही गावांचा विरोध

CD

इको सेन्सेटिव्ह झोनला
सहाही गावांचा विरोध

चौकुळ ग्रामसभेत एकमुखी ठराव

सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २३ : चौकुळ, नेने, मासुरे, केगद, कुंभवडे आणि खडपडे या गावांचा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समावेश करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत २१ ऑगस्टला झालेल्या चौकुळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सहाही गावांतील शेतकऱ्यांनी एकमताने विरोधाचा ठराव मंजूर केला. शासनाकडे हरकती नोंदविण्याचे ठरविण्यात आले.
ग्रामस्थांच्या मते, इको सेन्सेटिव्ह झोन लागू झाल्यास स्थानिकांच्या शेती, बांधकाम तसेच अन्य दैनंदिन व्यवहारांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित क्षेत्राबाबत ग्रामस्थांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन सरपंच गुलाबराव गावडे यांनी केले. ग्रामसभेला प्रशासक गुलाबराव गावडे, माजी सरपंच विजय गावडे, बाबू शेटवे, ग्रामपंचायत अधिकारी अमित राऊळ, प्रशासकीय समिती सदस्य आरती जाधव, लीना गावडे, मेघा मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी बापू गावडे, मधुकर गावडे, सुरेश गावडे, रुपेश गावडे, अजित गावडे, मृणाल गावडे, दीपक गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात H1N1चा फैलाव; नवा स्ट्रेन की जुना विषाणू? ICMRने सांगितलं सत्य, वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

Vivo V80 Lite: 10,000 mAh बॅटरीसह MediaTek प्रोसेसर अन् तगडा कॅमेरा; 3 सप्टेंबरला लाँच होतोय Vivoचा 5G स्मार्टफोन!

Marathi News Live Updates : ग्रामसेवकांच्या गैरहजेरीला आता लगाम! बायोमेट्रिकसह GPS हजेरी बंधनकारक, नियम मोडल्यास होणार कारवाई

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप! नेहा पिसाळ राज्य कर निरीक्षकपदी, जिद्दीला मिळाली यशाची पावती..

Vastu shastra: घरात लाकडी देवघर ठेवताय? वास्तुनुसार जाणून घ्या देवघर ठेवण्याची योग्य दिशा,उंची अन् स्वच्छतेचे नियम! 

SCROLL FOR NEXT