कोकण

द बिग स्टोरीसाठी कोट

CD

कोट
मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा तिढा आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून सुटला आहे. न्यायालयाने मार्ग काढल्याने हा प्रश्‍न मार्गी लागला. राजघराण्यात यापूर्वीच तडजोड झाली असती तर एवढ्यात पुढील कार्यवाही सुरू झाली असती. जनहितासाठी कौटुंबिक तिढा सोडविण्यासाठी आमदार केसरकर यांनी सातत्याने मेहनत घेतली. आता हा प्रश्न मार्गी लागल्याने काम लवकर पूर्ण होणार आहे. शासनाकडून ५० गुंठे जागा राजघराण्यास दिली आहे. मल्टिस्पेशालिटीमुळे जिल्ह्याचा आरोग्य समस्येचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भविष्यात तज्ज्ञ डॉक्टर कायमस्वरुपी राहण्यासाठी शासनाने योग्य तरतूद करावी.
- देव्या सूर्याजी, नगरसेवक, आमदार प्रतिनिधी, रुग्ण कल्याण नियामक समिती
..................
मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा तिढा सुटला असला तरी आरोग्याचा मूळ प्रश्न अद्याप कायम आहे. शहरात भव्य इमारती खूप उभ्या राहिल्या, पण आयुर्वेदिक हेल्थ पार्क सेंटर, मोठा गाजावाजा करून सुरू केलेले सुरक्षा रक्षक केंद्र, आर्ट गॅलरी, यूपीएससी व एमपीएससीसाठी सुरू केलेली ‘ज्ञान प्रबोधिनी’, टुरिस्ट रिसेप्शन सेंटर, वायर्स सेंटर आणि आंबोली पोलिस दूरक्षेत्रासमोरील टुरिस्ट पार्क हे सगळे प्रोजेक्ट्स आज बंद पडले आहेत. ​इमारती तर उभ्या राहतील, मात्र मल्टिस्पेशालिटीसाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर्स, टेक्निशियन आणि आवश्यक स्टाफ महाराष्ट्र शासन खरोखर देणार आहे का? या प्रश्नाची उत्तरे आधी मिळाली पाहिजेत. हे सर्वसामान्यांचे थेट प्रश्न आहेत. इतर इमारतींसारखी मल्टिस्पेशालिटी अवस्था धूळखात पडण्यासारखी व्हायला नको.
- बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष
..................
कोट
मल्टिस्पेशालिटीच्या जागेच्या प्रश्नावर नेहमी विरोधकांकडून टीका होत राहील, मात्र त्यामध्ये सातत्य ठेवून हा प्रश्न अखेर आमदार दीपक केसरकर यांनी सोडवून दाखवला आहे. आमदार कसा असावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे. मल्टिस्पेशालिटीचा मार्ग मोकळा झाल्याने भविष्यात येथील जनतेचे आरोग्याचे प्रश्न मिटणार आहेत. एक प्रकारे यातून जनतेला निश्चितच दिलासा मिळणार आहे. जसा जागेचा प्रश्न सोडवला तसाच भविष्यात रुग्णालय तातडीने उभारण्यासाठीही ते आपल्या कार्याची चूणूक दाखवून देतील, यात शंका नाही. आमदार केसरकर यांचे काम पाहता जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे यापुढेही निश्चितच राहतील.
- संजू परब, जिल्हा प्रमुख, शिंदे शिवसेना
....................
मल्टिस्पेशालिटी रुग्णालय प्रत्यक्षात कधी सेवेत येणार, हा मोठा प्रश्न आहे. पूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्यासारखे स्त्रीरोगतज्ज्ञ सेवा देत होते. त्यामुळे हे रुग्णालय गोरगरीब महिला व मातांसाठी अत्यंत हक्काचे आणि आश्वासक प्रसूती केंद्र ठरले होते. त्यानंतर डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनीही ही परंपरा समर्थपणे पुढे चालवली. ​मात्र, सध्या या रुग्णालयात एकही पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या कार्यरत असलेले कंत्राटी वैद्यकीय अधिकारी त्यांच्या परीने उपचार देण्याचा प्रयत्न करतात. परंतु, स्वतःची खासगी रुग्णालये सांभाळून ही सेवा दिली जात असल्याने ती सर्वसामान्यांच्या गरजेनुसार पुरेशी ठरत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञाची नियुक्ती करावी.
- किशोर चिटणीस, अध्यक्ष, अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग
---
सिंधुदुर्गतील मल्टिस्पेशालिटीचा पहिला शासन आदेश २०१८ मधील आहे. २०१९ मध्ये जागेचे आरक्षण, प्रशासकीय मान्यता आणि निधीची तरतूद होऊनही जागेच्या वादामुळे गेली आठ वर्षे हा प्रकल्प रखडला. अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लक्ष वेधल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली. जागेचा प्रश्न सुटला असला तरी प्रत्यक्ष रुग्णालय सुरू होईपर्यंत काय, हा मुख्य प्रश्न कायम आहे. ​सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट सक्षम नसल्याने गंभीर रुग्णांची गोव्यातील बांबुळी रुग्णालयाची फेरी टळलेली नाही. ‘गोल्डन अवर्स’मध्ये उपचार न मिळाल्याने रोज सरासरी सहा रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत. ​विशेष म्हणजे ट्रामा केअर युनिटमधील सर्व पाचही पदे रिक्त आहेत. लोकप्रतिनिधींनी यावर लक्ष केंद्रित करून ही पदे तातडीने भरावीत. मल्टिस्पेशालिटीचे काम पूर्ण होईपर्यंत हे युनिट पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील.
- अण्णा म्हापसेकर, सचिव, अभिनव फाउंडेशन
- राजू केळुसकर, सहसचिव, अभिनव फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT