कोकण

डाक विभागातर्फे विविध सेवा

CD

डाक विभागातर्फे विविध सेवा
सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, गोवा तसेच इतर शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी येतात. गावी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांना आधारच्या विविध सेवा गावाच्या जवळच सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत गावोगावात विशेष आधार सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये आधार नोंदणी, आवश्यक दुरुस्ती व अद्ययावत सेवा तसेच इतर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या गावांमध्ये विशेष आधार सेवा शिबिर आयोजित करावयाचे आहे, त्या गावांच्या सरपंचांनी डाकघर अधीक्षक, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी ४१६८१२ यांच्याकडे पत्राद्वारे किंवा dosindhudurg.mh@gmail.com या ई-मेलवर ५ सप्टेंबरपर्यंत कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना या शिबिरांचा लाभ मिळेल, यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग डाक विभागाचे डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपककर यांनी केले आहे.
---
करूळ येथे महावितरणचा नवा डीपी
वैभववाडी : करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे (रोहित्र) उद्‍घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील व पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन डीपीमुळे गावातील बऱ्याचश्या वाडीतील व परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. उद्घाटनप्रसंगी सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, रवींद्र पवार, प्रकाश सावंत, महेश कदम, सचिन कोलते, रोहिणी लाड, शरद सावंत, राजेंद्र गुरव, सिद्धेश कोलते, सुधीर पवार, विजय पवार, दिलीप पवार तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी श्री. तळेकर, वायरमन श्री. गायकवाड, श्री. पाटनकर, अवि गुरव आदी उपस्थित होते.
--------
केयांश हरमलकरचे शिष्यवृत्तीत यश
वेंगुर्ले : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पेंड्याची वाडी पेंडूर येथील विद्यार्थी केयांश प्रसाद हरमलकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात तिसरा व जिल्ह्यात ३४ वा क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला आहे. शाळेने सलग तिसऱ्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले. शिक्षक समीर मोहन तेंडुलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक मार्गदर्शनाची दखल घेत पेंडूर ग्रामपंचायतीमार्फत त्यांना १५ ऑगस्ट रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान अर्जुन बरकुटे, माजी उच्चश्रेणी मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर, माजी पदवीधर शिक्षक मुकुंद काळॉजी, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच संतोष गावडे आणि ग्रामस्थांनी केयांशचे व मार्गदर्शक शिक्षक समीर तेंडुलकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
--------
सावंतवाडीत राजीव गांधींना अभिवादन
सावंतवाडी : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंतीदिनी सावंतवाडी तालुका काँग्रेसच्यावतीने उभा बाजार येथील कार्यालयात अभिवादन केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुर्कर यांनी राजीव गांधी यांचे विचार मांडले. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, सरचिटणीस राजेंद्र मसुर्कर, ज्येष्ठ नेते सुधीर मल्हार, काँग्रेस कार्यकर्ते संजय लाड, काँग्रेस संयोजक संतोष जोईल, कौस्तुभ पेडणेकर, काँग्रेस मीडिया तालुकाध्यक्ष आफतब हेरेकर, तालुका सरचिटणीस पीटर फर्नांडीस, माजी शहराध्यक्ष अरुण भिसे, तालुका खजिनदार प्रदीप चौगुले, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोज नार्वेकर, संतोष पेडणेकर, साबा जी उर्फ बाळा नाईक, सगुन गावकर, अक्षय तळवडकर आदी उपस्थित होते.
---
कणकवली वाचनालयात ‘जल संधारण दिन’
कणकवली : नगर वाचनालय कणकवली येथे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म दिवस जल संधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे २१ ऑगस्ट हा दिवस राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म दिवस जल संधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने कणकवली नगर वाचनालयात नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले वाहून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मृदा व जलसंधारणाची शपथ घेण्यात आली.
---
मालवणात वजनकाटे पडताळणी शिबिर
मालवण : निरीक्षक वैद्य मापनशास्त्र विभाग, मालवणतर्फे तालुक्यातील व्यापारी बांधवांनी काटे, वजनमापे, इलेक्ट्रिक काटे यांचे फेरपडताळणी व मुद्रांकन (सिक्के) करण्यासाठी मालवण मेढा आढाव बिल्डिंग याठिकाणी २४ व २५ ऑगस्ट रोजी पडताळणी शिबीर आयोजित केले आहे. सर्व मच्छीमार, रॉकेल, काजू किराणा, रेशन शॉप, भाजी व चिकन, मटन विक्रेत्यांनी काटे, वजने मापे सकाळी ९ वाजता घेऊन यावीत. तसेच आपले आधारकार्ड, मागील पावती व प्रमाणपत्र गरजेचे आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन विजय नेमळेकर यांनी केले आहे.
---
‘श्री चौंडेश्वरी’ची दोन सप्टेंबरला सभा
कणकवली : श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कणकवली या संस्थेची चोविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता संस्थेचे कार्यालय मसुर्कर किनई, आचरा रोड, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेला सर्व समासदांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापक प्रवीण कवडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : '२४ जिल्हे, २४ संकल्प आणि एक आवाज' या माध्यमातून आम्ही भरती प्रक्रियेतील सुधारणांसाठी आवाज उठवू - देवेंद्र नाथ महतो

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT